Success Story Of M Sivaguru Prabhakaran In Marathi : एखाद्या व्यक्तीला आयुष्यात जर काही मिळवायचे असेल, तर तिने ती गोष्ट मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असते. मग ते कोणतेही क्षेत्र असो. प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. मुख्य ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा अपयशाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाचा स्वप्नपूर्तीपर्यंतचा प्रवास वेगवेगळा असतो. थोडक्यात यश ही नशिबाने नाही, तर मेहनतीने मिळणारी गोष्ट आहे. तर, आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा यशोमार्गावरील प्रवास म्हणजे लवचिकता आणि दृढनिश्चयाचा अप्रतिम दाखला आहे. अनेक अडथळ्यांना तोंड देत, त्यांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण केले आहे.

आयएएस अधिकारी एम. शिवगुरू प्रभाकरन (Success Story Of M Sivaguru Prabhakaran) हे तमिळनाडूचे रहिवासी आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रभाकरन यांचे आयुष्य आर्थिक संघर्ष आणि कुटुंबातील समस्यांनी वेढलेले होते. वडिलांना मद्यपानाचे व्यसन असल्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणीवर त्यांचे कुटुंब सांभाळण्यासाठी दबाव येत होता. पण, या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केले.

Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
gadchiroli tribal couple
मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा; आदिवासी दाम्पत्याची व्यथा, तीन दिवसांपासून उपाशी, पत्नीचे मंगळसूत्र मोडले
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?
Success Story Of Satvat Jagwani In Marathi
Success Story : दोन वर्षात सोडली आयआयटी, उघडलं स्वतःच युट्युब चॅनेल; वाचा टॉपर सत्वत जगवानीची गोष्ट

हेही वाचा…Kamlesh Kamtekar: ‘खड्ड्यात गेली नोकरी…’ १४ वर्षांचा अनुभव; पण मिळाला नाही जॉब, हार न मानता सुरू केला स्वतःचा व्यवसाय

आपल्या कुटुंबाच्या सॉमिल व्यवसायात (sawmill business) मदत करण्यासाठी त्यांनी आपली शैक्षणिक योजनांचा त्याग केला. पण, त्यांचे मन भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी स्थिर राहिले. बहिणीच्या लग्नामुळे कुटुंबाला काही ओझ्यापासून मुक्तता मिळाली, प्रभाकरन यांनी या संधीचा उपयोग करून, आपले शिक्षण पुन्हा सुरू केले. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी लहान भावाच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या कठोर परिश्रमाने त्यांना वेल्लोरमधील प्रसिद्ध थंथाई पेरियार गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नेले, जिथे त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंगचा कोर्स केला आणि एक एक्झम्पप्लरी प्रोफेशनल (exemplary professional) म्हणून स्वतःला प्रस्थापित केले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रभाकरन (Success Story Of M Sivaguru Prabhakaran) यांची कामासाठीची धडपडसुद्धा सुरूच होती. सेंट थॉमस माऊंट रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ते झोपायचे. या सगळ्यात परिस्थिती-अभ्यासातील त्यांचे समर्पण दिसून आले आणि अखेर त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले. २०१४ मध्ये मद्रास येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT-M) मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला.

आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले (Success Story Of M Sivaguru Prabhakaran)

यूपीएससी परीक्षेकडे आशेने बघत असलेल्या प्रभाकरन यांना अनेक वेळा अपयशाला सामोरे जावे लागले; पण त्यांनी हार मानली नाही. उलट प्रत्येक अपयशाने त्यांना अधिकाधिक मजबूत केले. चौथ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक १०१ मिळवली आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. प्रभाकरन यांची जीवनकथा ही एका गोष्टीची आठवण करून देते की, धैर्य आणि चिकाटीने मोठ्या आव्हानांचाही सामना केला जाऊ शकतो. त्यांचे जीवन आपल्याला मर्यादेच्या पलीकडे ढकलण्यासाठी आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी दृढनिश्चयाने प्रेरित करते.

Story img Loader