Success Story Of Manoj Kumar Sahoo : प्रत्येकाच्या आयुष्यातील यशोमार्गावरील प्रवास खडतर असतो. अनेक जण कारणं देत टाळाटाळ करतात; तर काही जण सगळ्या समस्यांवर मात करून आयुष्यात पुढे काहीतरी करण्याच्या जिद्दीने धाडस करीत अथक मेहनत घेतात आणि यशस्वी होऊन दाखवितात. अशा रीतीने स्वतःचे एक प्रेरणादायी उदाहरण जगापुढे ठेवतात. आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत (Success Story ); जे प्रतिष्ठित पदावर नियुक्त होणारे पहिले ओडिशा अधिकारी ठरले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर, या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे मनोज कुमार साहू. ओडिशा सरकारने २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी मनोज कुमार साहू यांची मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या खासगी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. पूर्वी मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव म्हणून कार्यरत असलेले मनोज कुमार साहू आता जनरल ॲडमिनिस्ट्रेशन आणि पब्लिक ग्रीव्हन्स डिपार्टमेंट (सार्वजनिक तक्रार विभागाकडून) जारी केलेल्या अधिसूचनेसह या पदावर नियुक्त झाले आहेत. खासगी सचिव हे राज्याच्या आयएएसमधील विशेष दर्जाचे पद आहे.

हेही वाचा…Success Story Of M Sivaguru Prabhakaran : कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी सोडली नोकरी; ‘या’ संधीचे केले सोने अन् पूर्ण झाले ‘त्याचे’ आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न

साहू हे जगतसिंगपूर जिल्ह्यातील बालीकुडा ब्लॉकमधील एक गाव आहे. मनोज कुमार साहू अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (एजीएमयूटी) केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) वरिष्ठ अधिकारी आहेत (Success Story ). २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अरिंदम डाकुआ यांची पुनर्नियुक्ती झाल्यानंतर मनोज कुमार साहू यांना ही नियुक्ती मिळाली आहे, जे महापालिका प्रशासनाच्या संचालकांचे खासगी सचिव आणि गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे सचिव होते.

प्रतिष्ठित पदावर नियुक्त

नोव्हेंबर २०२४ मध्ये केंद्राने मनोज कुमार साहू यांच्या इंटर-काड्रे (inter-cadre) प्रतिनियुक्तीला तीन वर्षांसाठी ओडिशात मंजुरी दिली. याआधी मनोज कुमार साहू यांनी नोव्हेंबर २०२२ पासून डेप्युटी इलेक्शन कमिशनर म्हणून काम केले होते. त्यामुळे प्रतिष्ठित पदावर नियुक्त होणारे पहिले ओडिशा अधिकारी बनून त्यांनी इतिहास घडवला आहे. तर, असा मनोज कुमार साहू यांचा प्रवास आहे. तर, असा मनोज कुमार साहू यांचा प्रवास आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) वरिष्ठ अधिकारी मनोज कुमार साहू यांची शनिवारी केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या उपायुक्तपदी नियुक्ती केली. मनोज कुमार साहू यांना सात वर्षांसाठी निवडणूक आयोगाचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of manoj kumar sahoo who 2006 batch ias officer to the post of private secretary to chief minister mohan charan majhi asp