Success Story Of Manu Agrawal In Marathi : एखादी व्यक्ती यशस्वी झाली की, तिची गोष्ट ऐकून अनेक जण प्रेरणा घेतात. पण, अशा व्यक्तींना यशस्वी होण्याआधी खूपदा संघर्ष करावा लागतो. तर, अशीच एक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. या व्यक्तीने अनेक वेळा अपयशाचा सामना केला. पण त्याने हार मानली नाही आणि मास्टर कोर्सेस ऑफर करणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म स्थापन केले. तर कोण आहे ही व्यक्ती चला जाणून घेऊ(Success Story Of Manu Agrawal)…
मनू अग्रवाल, असे या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे मनू अग्रवालने हिंदी माध्यमातून सरकारी शाळेत शिक्षण घेतले; जेथे त्याला शैक्षणिक, विशेषतः गणित विषयासाठी संघर्ष करावा लागला (Success Story Of Manu Agrawal). एआयईईई परीक्षेत चांगले गुण मिळविल्यानंतर मनूने बुंदेलखंड विद्यापीठात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए) पदवी घेऊन उच्च शिक्षणाला सुरुवात केली. पण, पदवीनंतर नोकरी शोधणे सोपे नव्हते. शेवटी विप्रोमध्ये नोकरी मिळवण्यापूर्वी त्याला ३५ हून अधिक कंपन्यांकडून नकाराचा सामना करावा लागला. तो केवळ १० हजार रुपये इतक्या मासिक वेतनावर काम करत होता.
त्यानंतर मनूने तिरुचिरापल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मध्ये कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स (MCA)मध्ये मास्टर्स केले. २०१६ मध्ये जेव्हा मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिपसाठी त्याची निवड झाली तेव्हा त्याला मेहनतीचे फळ मिळाले. या संधीचे रूपांतर अमेरिकेतील सिएटल येथील मायक्रोसॉफ्टमधील नोकरीत झाले; ज्यात वार्षिक १.९ कोटी रुपयांचे पॅकेज त्याला मिळाले.
ट्युटॉर्ट अकादमी
एवढ्या यशानंतर मनूला कोविड-१९ महामारीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या विनंतीमुळे भारतात परत यावे लागले. मग तो गूगल कंपनीसाठी सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करू लागला. पण, त्याच्या उद्योजकतेच्या भावनेने त्याला नोकरी सोडायला लावली आणि २०२१ मध्ये त्याने त्याचा मित्र अभिषेक गुप्ताबरोबर ट्यूटोर्ट अकादमीची सह-स्थापना केली.
ट्युटॉर्ट अकादमी म्हणजे प्रोग्रामिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व सॉफ्टवेअर इंजिनियरिंगशी संबंधित इतर क्षेत्रातील मास्टर कोर्सेस ऑफर करणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. हे व्यासपीठ आयआयटी, एनआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील अनुभवी प्रशिक्षकांद्वारे समर्थित आहे. आज मनू अग्रवाल आणि ट्यूटोर्ट अकादमीचे उद्दिष्ट १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवणे आणि उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्यांसह त्यांना सक्षम करणे आहे. त्याचा प्रवास इतर असंख्य लोकांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा देतो (Success Story Of Manu Agrawal).