Success story of Manyavar Founder Ravi Modi: प्रयत्नांती परमेश्वर, असं म्हणतात ते काही खोटं नाही. अथक प्रयत्न, मेहनत केली, तर यश आपली पाठ नक्कीच थोपटतं. हीच बाब लक्षात घेऊन, सध्या भारतातील जिद्दी तरुण अथक मेहनत घेत उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती घडवीत आहेत.

भारतीय तरुणांची जिद्द, त्यांची आवड अन् परिश्रम यामुळे अर्थव्यवस्थेत एक प्रकारचा इतिहासच घडत आहेत. आजकाल तरुण स्टार्टअप्स, व्यवसाय करण्यासाठी आपणहून पुढाकार घेत असले तरी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी जीवनातील अनुभव तुम्हाला खूप मोठी मदत करतो. असाच अनुभव गाठीशी घेऊन प्रसिद्ध उद्योजक रवी मोदी यांनी ‘वेदांत फॅशन्स’ अन् ‘मान्यवर’ची निर्मिती केली.

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
syntel founder Bharat Desai Success Story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores
व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास
Shiv Nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news
शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर उद्योगपती; आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांचे दातृत्व
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : “महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना ३ हजार रुपये आणि बस प्रवास मोफत”, राहुल गांधींची गॅरंटी
Rahul Gandhi Deekshabhoomi visit
राहुल गांधींची दीक्षाभूमीला भेट, अभ्यागत पुस्तिकेत लिहिला ‘हा’ संदेश… त्याची सर्वत्र चर्चा

१३ व्या वर्षीच करिअरची मुहूर्तमेढ

अवघ्या १३ व्या वर्षी रवी मोदी यांनी आपल्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून करत आपल्या करिअरची मुहूर्तमेढ रोवली. अगदी कमी वयामध्ये इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्याने त्यांनी त्यांच्या करिअरचा पाया मजबूत केला होता. नंतर २००२ मध्ये मोदी यांनी कोलकाता येथे ‘वेदांत फॅशन’ सुरू करण्यासाठी त्यांच्या आईकडून १० हजार रुपये उसने घेतले. भारतीय पोशाख उद्योगात क्रांती घडवून आणणाऱ्या त्यांच्या प्रवासाची ही सुरुवात होती.

‘मान्यवर’ची निर्मिती

रवी मोदी यांची दूरदृष्टी आणि समर्पण यांमुळे भारतीय विवाहसोहळा आणि पारंपरिक पोशाखांचा ब्रॅण्ड असलेल्या ‘मान्यवर’ची निर्मिती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘मान्यवर’ आणि त्यांचे को-ब्रॅण्ड मोहे, मंथन, मेबाज व त्वामेव यांची घराघरांत ओळख निर्माण झाली.

विराट कोहली, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, आलिया भट्ट कार्तिक आर्यन यांसारख्या टॉप सेलिब्रिटींकडून मिळालेल्या समर्थनामुळे ‘मान्यवर’ची लोकप्रियता वाढली. त्यांच्या पाठिंब्यामुळे लग्नाच्या पोशाखात एक अग्रगण्य नाव म्हणून ‘मान्यवर’चा दर्जा वाढला.

हेही वाचा… स्वप्नांपुढे सारे फिके! एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा

आज ‘वेदांत फॅशन्स’चे भारतातील २४८ शहरे आणि १६ आंतरराष्ट्रीय ठिकाणे येथे ६६२ स्टोअर्स आहेत. कंपनीच्या लक्षणीय वाढीमुळे तिचे मूल्यांकन ₹३२ हजार कोटींवर पोहोचले आहे. रवी मोदींच्या उद्योजकीय प्रवासानं त्यांचं नेटवर्थ प्रभावी उंचीवर नेलं आहे. एप्रिल २०२३ पर्यंत त्यांची संपत्ती तीन अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. त्यामुळे ते फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत १,२३८ व्या क्रमांकावर आणि भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांमध्ये ६४ व्या स्थानावर आहेत.

हेही वाचा… Flipkartला विकली कंपनी अन्…, आज आहेत भारतातील सर्वात मोठ्या जिमचे संस्थापक; वाचा प्रसिद्ध उद्योजक मुकेश बन्सल यांची यशोगाथा

आईने उसन्या दिलेल्या १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे ३२ हजार कोटी रुपयांच्या साम्राज्यात रूपांतर करणारी रवी मोदी यांची कथा दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. ‘वेदांत फॅशन्स’मधील त्यांच्या यशामुळे उद्योजकांना खचितच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही.