आजच्या काळात जिथे काही तरुण त्यांच्या आयुष्यातील समस्यांना तोंड न देता हार मानतात, तिथे असेही काही तरुण आहेत जे कठीण परिस्थितीतही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि कठोर परिश्रम करून यशस्वी होतात. आज आपण मोहन अभ्यास याच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे जीवन लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत बनू शकते.

मोहन हा समोसे विकणाऱ्या कुटुंबातून येतो, जिथे त्याच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत दिवसभर समोसे विकणे आहे. मोहनने केवळ त्याच्या कुटुंबाला समोसे बनवण्यात मदत केली नाही तर त्याने स्वप्न बघायचं सोडलं नाही. घरातलं काम करत असताना त्याने अभ्यास केला आणि यश मिळवून त्याने सर्वांना दाखवून दिले की आर्थिकदृष्ट्या कितीही अडचणी आल्या तरी दृढ निश्चयाने सर्व काही शक्य आहे.

मोहन हा एका छोट्या शहरातील एका सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांचे एक छोटेसे समोसे दुकान होते. आर्थिक अडचणी असूनही मोहनने हार मानली नाही आणि अभ्यास केला. घरकाम आणि अभ्यासासाठी तो वेळेचे व्यवस्थापन आणि नियमित सरावाचा दैनंदिन दिनक्रम पाळत असे. जेईई अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न समजून घेतल्यानंतर त्याने चांगली तयारी केली आणि परीक्षेत यश मिळवले.

मोहनने जेईई मेन २०१७ मध्ये ऑल इंडिया रँक ६ मिळवला होता. याशिवाय त्याने जेईई ॲडव्हान्स्ड २०१७ मध्येही चांगली कामगिरी केली आणि देशात ६४ वा क्रमांक मिळवला. हा क्षण त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप मौल्यवान होता. जेईई उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळाला. मोहनने संगणक शास्त्रात बी.टेक केले. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन सध्या अमेरिकेतील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे.

Story img Loader