Success story of Nadia Chauhan: फ्रुटी, ॲपी आणि बेली पाण्याची बॉटल यांची नावं तुम्ही जरूर ऐकली असतील. तसंच तुम्ही या ड्रिंक्सचे सेवनदेखील केले असेलच. फ्रुटी आणि ॲपी हे आधीच खूप प्रसिद्ध होते, पण गेल्या काही वर्षांपासून बेली वॉटर, बिसलेरी आणि किनलीलाही टक्कर देत आहे. ही प्रसिद्ध उत्पादने प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय नादिया चौहान यांना जाते. तिने हा व्यवसाय सुरू केला नसला तरी त्याला ओळख देण्याचे काम नादियाने केले. आज आपण जाणून घेणार आहोत नादिया चौहानबद्दल, जिने आपल्या कौटुंबिक व्यवसायाला ३०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरसह ८,००० कोटींपेक्षा अधिक उंचीवर नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्रुटी, ॲपी आणि बेली वॉटर बनवणाऱ्या कंपनीचे नाव पार्ले ॲग्रो आहे. त्याची स्थापना १९८५ मध्ये झाली. याच वर्षी कंपनीचे संस्थापक प्रकाश चौहान यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव नादिया ठेवले. नादिया जसजशी मोठी झाली, तसतसा कंपनीचा व्यवसायही वाढू लागला. नादिया चौहान १७ वर्षांची झाली तेव्हा पार्ले ॲग्रोचा टर्नओव्हर ३०० कोटींवर पोहोचला होता.

हेही वाचा… रतन टाटा यांची बिझनेस ऑफर नाकारली आणि वर्षभरात कमावले २३०० कोटी रुपये, वाचा जयंती चौहान यांच्या यशाचं सीक्रेट

नादियाने मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर तिने बिझनेस आणि मार्केटिंगचे उच्च शिक्षण घेतले. ती जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हाच तिला व्यवसायात रस येऊ लागला. २००३ मध्ये तिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि कौटुंबिक व्यवसायात ती पूर्णपणे गुंतली. तिने आपला व्यवसाय पूर्णपणे समजून घेतला आणि नंतर त्याच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पार्ले ॲग्रोचा औपचारिक भाग बनून तिने पहिले मोठे आव्हान पेलले. फ्रुटी ब्रँड अनेक आव्हानांना तोंड देत होता. हा ब्रॅंड पुन्हा एकदा जिवंत करण्याचे आव्हान नादिया चौहानसमोर होते. इतर अनेक कंपन्या फ्रुटीसमोर आव्हान म्हणून उभ्या होत्या. फ्रुटीला त्याच्या जागी परत आणण्यासाठी नादियाने एक अभिनव मोहीम चालवली, ज्याची टॅगलाईन होती, Why Grow Up? म्हणजे मोठं व्हायची काय गरज? फ्रुटीची टॅगलाइन लगेच प्रसिद्ध झाली. आता फ्रुटी ६५ मिली ते १.८ लिटरच्या पॅकमध्येदेखील येते.

हेही वाचा… शाळा सोडली, बारावीत नापास झाला पण हार मानली नाही! पाहा पठ्ठ्याने कशी सुरू केली अब्जावधीची कंपनी; आता रिलायन्स, BSE सारख्या मोठ्या कंपन्यांना देतोय सेवा

नादिया चौहान या कंपनीत रुजू झाल्या तेव्हा कंपनीचा टर्नओव्हर ३०० कोटी रुपये होता. २०१७ पर्यंत तो ४,२०० कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचला होता.२०२२-२३ पर्यंत ८,००० कोटी रुपयांपर्यंत पार्ले ॲग्रोचा टर्नओव्हर वाढला. नादियाचे धोरणात्मक नियोजन या विस्ताराचा एक महत्त्वाचा पैलू मानले जाते, ज्याचा उद्देश कंपनीचा प्रोडक्ट पोर्टफोलिओ वाढवणे हा होता. नादियाने २००५ मध्ये ॲपी (Appy Fizz) लाँच केले.

आशियातील पॉवर व्यावसायिक महिलांच्या यादीत नाव

नादिया कधीही जोखीम घेण्यास घाबरली नाही, उलट तिने पार्ले ॲग्रोच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आणि ॲपी फिझ आणि बेली वॉटरसारखे यशस्वी ब्रँड लाँच केले. तिची दृष्टी केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. तिच्या कंपनीला जागतिक ओळख देण्याचे स्वप्न तिने पाहिले. तिच्या नेतृत्वाखाली पार्ले ॲग्रोच्या कमाईने विक्रमी उच्चांक गाठला आणि कंपनीची भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या FMCG कंपन्यांमध्ये गणना झाली. २०१८ मध्ये तिला फॉर्च्यून इंडियाच्या ४० अंडर ४० यादीत स्थान मिळाले. याशिवाय फोर्ब्सच्या आशियातील पॉवर बिझनेस वुमनच्या यादीतही तिचे नाव सामील झाले होते.

वैयक्तिक जीवन

आज नादिया चौहान पार्ले ॲग्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर आहेत, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यातही ती व्यवसायाप्रमाणेच सक्रिय आणि यशस्वी आहे. तिचे पती राधे श्याम दीक्षित हे देखील एक यशस्वी व्यापारी आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत. व्यस्त वेळापत्रक असूनही नादिया आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of nadia chauhan managing director of parle agro brand owner of appy fizz bailey water company dvr