Success Story Of Nitin Shakya In Marathi : शाळेत प्रत्येक वर्गात एखादा तरी हुशार विद्यार्थी हा असतोच. हा हुशार विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये ‘टॉप’ राहत असतो. त्यामुळे आयएएससारख्या प्रतिष्ठित पदांसाठी तो योग्य आहे, असे सर्वांना वाटते. पण, आज आपण अशा एका विद्यार्थ्याबद्दल (Success Story Of Nitin Shakya ) जाणून घेणार आहोत; ज्याच्या शाळेतील मुख्याध्यापकांना तो नापास होईल याची खात्री होती. पण, आज हाच विद्यार्थी यूपीएससी पास होऊन आयएएस अधिकारी होऊन, त्याने शिक्षकांना ते कसे चुकीचे होते ते दाखवून दिले आहे.

तर, या आयएएस अधिकाऱ्याचे नाव नितीन शाक्य (Success Story Of Nitin Shakya ) असे आहे. नितीन यांना १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र नाकारण्यात आले. कारण- त्याच्या मुख्याध्यापकांना खात्री होती की, तो नापास होईल. तरीही त्यांचा स्वत:वर अतूट विश्वास होता. त्या आत्मविश्वास व मेहनतीच्या बळावर ते केवळ उत्तीर्णच झाले नाहीत, तर त्यांनी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुणही मिळवून दाखवले. शिक्षकांचे डोळे दीपविणाऱ्या त्यांच्या या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. त्यामुळे पुढे त्यांना वैद्यकीय करिअर करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
Vivek Phansalkar has additional charge of the post of Director General
मुंबई : विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

हेही वाचा…Success Story Of Sanam Kapoor : ‘आयटी’तील नोकरी सोडून सुरू केला पिझ्झा ब्रॅण्ड; वाचा लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणाऱ्या सनम कपूरचा प्रवास

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली सुरू…

नितीन यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. ॲनेस्थेसिया आणि क्रिटिकल केअरमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन (विशेष प्रशिक्षण) घेतले. नंतर त्यांनी लोकनायक हॉस्पिटल, गुरू नानक आय सेंटर व सुश्रुत ट्रॉमा सेंटर येथून काम केले. यावेळी त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची सेवा केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, एक आयएएस (IAS) अधिकारी म्हणून ते आणखीन चांगले काम करू शकतात.

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची सेवा करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन, नितीन यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची (सीएसई) तयारी सुरू केली. तसेच त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास केली; पण ते मुलाखतीत १० गुणांनी मागे पडले. त्यांनी जिद्द कायम ठेवत दोन वेळा प्रयत्न केले; पण ते पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या पुढे जाऊ शकले नाहीत. या अडथळ्यांनंतरही नितीन यांनी हार मानली नाही. २०१८ मध्ये चौथ्या प्रयत्नात अखेर ते यूपीएससी परीक्षा पास झाले आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न (Success Story Of Nitin Shakya ) त्यांनी पूर्ण केले.

Story img Loader