Success Story of Pallav Bihani: तंदुरुस्त असणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. पंचवीस वर्षीय उद्योजक पल्लव बिहानी यांना हे खूप लवकर कळले. जेव्हा त्यांना शाळेत असताना, त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या अगदी आधी स्लिप डिस्कचा त्रास झाला.

SMBStory शी संवाद साधताना ते म्हणाले, “माझे वजन १०५ किलोग्रॅम होते आणि मला जाणवले की, मला निरोगी राहण्यासाठी फिटनेस पद्धत सुरू करणे आवश्यक आहे. माझ्या कॉलेजच्या पहिल्या वर्षात मी जिममध्ये जाऊन हेल्थ सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात केली. यास थोडा वेळ लागला, परंतु मी माझे वजन कमी करू शकलो; पण मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे फिटनेसचा खर्च.”

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
president droupadi murmu article on birsa munda s work
बिरसा मुंडा यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे!
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

भारतात फिटनेस परवडणारे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. फिट राहण्यासाठी हेल्थ सप्लिमेंट्स आणि फिटनेस एक्सेसरीजपासून ते इम्युनिटी बूस्टरपर्यंत लोकांना इतका मोठा खर्च परवडत नाही.

पल्लव बिहानी, बोल्डफिट

रुग्णालयातील वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कुटुंबातील पल्लव यांनी पदवीनंतर कौटुंबिक व्यवसायात हातभार लावण्याचा निर्णय घेतला. तथापि त्यांना कालांतराने कळले की, आधीपासूनच स्थापित केलेल्या आणि यशस्वीरित्या चालू असलेल्या व्यवसायात ते जास्त काही हातभार लावत नाही आहेत. त्याचवेळी त्यांनी प्रत्येकासाठी फिटनेस उपलब्ध करून देण्याचा विचार करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांनी जानेवारी २०१९ मध्ये बेंगळुरूमध्ये बोल्डफिटची स्थापना केली.

हेही वाचा… Success Story: ट्रक विक्रीपासून सुरुवात ते आज यशस्वी उद्योजक; राजस्थानमधील ‘या’ तरुणाने गाठलं तिशीच्या आत यशाचं शिखर

पल्लव असंही म्हणाले की, बोल्डफिट सुरू करण्याचा त्यांचा मुख्य हेतू प्रत्येकासाठी फिटनेस उपलब्ध करून देणे हा होता आणि म्हणून त्यांनी वडिलांकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा D2C health आणि fitness ecommerce ब्रँड सुरू केला.

संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी रोख रक्कम कमी होती आणि पल्लव कोणत्याही बाह्य निधीची मागणी करण्यास तयार नव्हता आणि म्हणून त्याने लघु उद्योग सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि योगा मॅट्सपासून सुरुवात केली.

फक्त एका उत्पादनापासून सुरुवात करून, Boldfit कडे आता फिटनेस आणि योग, पोषण, आरोग्य आणि निरोगीपणा यासह ३० SKU आहेत. यातले १७ SKU नोव्हेंबर २०२० मध्ये जोडले गेले. Boldfit उत्पादनांची किंमत १९९ रुपयांपासून सुरू होते.

हेही वाचा… Success Story: ‘या’ उद्योजकाने ३० वर्षांच्या आधीच गाठला कोट्यवधींचा टप्पा; ‘हा’ व्यवसाय करून तरुण पोहोचला यशाच्या शिखरावर

योगा मॅट्सच्या यशानंतर, पल्लव यांनी पौष्टिक आणि निरोगीपणासाठी पूरक आहार सुरू करण्यासाठी Boldfit चा विस्तार केला, जिथे त्यांनी प्रथिने, मल्टीविटामिन, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे, डिटॉक्स गोळ्या आणि इतर प्रोडक्ट्स लाँच केले.

Boldfit चे प्रोडक्ट्स Amazon, Flipkart, MensXP सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या स्वतःच्या पोर्टलद्वारे प्रोडक्ट्सची विक्री होते.

ब्रॅंड सुरू झाल्यापासून दोन वर्षांत, डिसेंबर २०२० पर्यंत वार्षिक ३० कोटी रुपयांची उलाढाल करत असल्याचा दावा पल्लव करतात.