Success Story of PCS Officer Swati Gupta: देशात अनेक महिला आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि पीसीएस (PCS) अधिकारी आहेत. यापैकी काही महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी होण्यासाठी त्यांच्या जीवनात अनेक आव्हाने झेलली. या आव्हांनावर मात करत त्यांनी यशाचं शिखर गाठलं. अशाच एका महिलेने अखंड मेहनत करून तिचं स्वप्न साकार केलं आहे. अलीकडेच एका पीसीएस महिला अधिकाऱ्याची रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जाणून घेऊयात या PCS अधिकाऱ्याची प्रेरणादायी गोष्ट.

पहिल्याच प्रयत्नात PCS

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अधिकारी स्वाती गुप्ता यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. त्या २०१७ च्या बॅचच्या PCS अधिकारी आहेत आणि सध्या पंचायती राज विभागात कार्य अधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपी पीसीएस परीक्षा उत्तीर्ण केली.

हेही वाचा… Success Story: वडिलांच्या व्यवसायासाठी सोडली उच्च पगाराची नोकरी, आता आहेत कोटींच्या मालकीण; जाणून घ्या अमीरा शाह यांचा प्रवास

पंचायती राज विभागातील कार्य अधिकारी म्हणून त्यांच्या भूमिकेत पंचायतीचे बजेट, खर्च आणि त्यांच्याकडून होणारे बांधकाम यावर लक्ष ठेवण्याच्या जबाबदाऱ्या आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

स्वाती गुप्ता यांचे वडील चित्रा कुमार हे एक शिक्षक आहेत, ज्यांनी तिला केवळ चांगले शिक्षण मिळण्यासाठीच मदत केली नाही तर तिला अधिकारी होण्यासाठीदेखील प्रेरित केले. तसंच स्वाती यांना दोन भाऊ आहेत, त्यापैकी एक भाऊ डॉक्टर आहे. स्वाती गुप्ता यांची आई गृहिणी आहे.

स्वाती गुप्ता यांचं शिक्षण

स्वाती गुप्ता यांनी टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स केले आहे. त्या बारावीत विज्ञान शाखेत होत्या. स्वाती यांनी त्यांचा अनुभव सांगताना सांगितले की, सुरुवातीच्या काळात पीसीएस/यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करणे त्यांना खूप कठीण गेले, परंतु नंतर ते समजून घेण्यासाठी आणि परीक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी त्यांनी दिल्लीतून कोचिंग घेेतले.

हेही वाचा… Success Story : इंटर्नशिप ते दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय; संदीप अग्रवाल कसे झाले दोन यशस्वी भारतीय स्टार्टअपचे संस्थापक, वाचा…

PCSसह दिल्या ‘या’ परीक्षा

स्वाती गुप्ता यांनी शेअर केले की, त्यांनी एकदा UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती, परंतु मुलाखतीत त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर त्यांनी २०१७ आणि २०१८ मध्ये दोनदा उत्तर प्रदेश PCS क्लिअर केली. त्यांनी PGT कॉम्प्युटर सायन्स परीक्षा, IB असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर परीक्षा, राजस्थान लोकसेवा आयोग प्रशासकीय सेवा परीक्षा, मंडी निरीक्षक परीक्षा आणि PCS फॉरेस्ट ऑफिसर परीक्षा उत्तीर्ण केली.

हेही वाचा… Success Story: घर सोडलं, रस्त्यावर फिरला पण हार मानली नाही; बाईक कव्हरचा व्यवसाय, प्रोडक्टमध्ये ट्वीस्ट अन् आज कोट्यावधींची उलाढाल

मुलींना दिला मोलाचा सल्ला

स्वाती गुप्ता यांनी मुलींना एक मोलाचा सल्ला दिला. त्यांनी पालकांना विश्वासात घेऊन स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास मुलींना सांगितले. त्यांनी शेअर केले की, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि मोटिव्हेशनल स्पीकर बी. के. शिवानी त्यांच्या रोल मॉडल आहेत.