Pearl Kapur: भारतीय तरुणांची जिद्द, आवड अर्थव्यवस्थेत एक प्रकारचा इतिहासच घडवत आहे. आजकाल तरुण स्टार्टअप्स, व्यवसाय करण्यासाठी आपणहून पुढाकार घेत आहेत. अगदी कमी वयात स्वत:ला सिद्ध करून दाखवत यशस्वी प्रवासाची सुरुवात करत आहेत. जगभरात अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. यात भारताचंही नाव अग्रगण्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील असेच एक अब्जाधीश सध्या चर्चेत आहेत. देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून त्यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ज्यांनी अगदी लहान वयात अब्जावधी डॉलर्सची कंपनी स्थापन केली आहे. त्यांचं नाव म्हणजे पर्ल कपूर.

२७ व्या वर्षी पर्ल कपूर हे भारताच्या व्यावसायिक जगतात एक आदर्श बनले आहेत. Zyber 365 ग्रुपचे संस्थापक म्हणून त्यांनी ब्लॉकचेन आणि सायबर सिक्युरिटीमध्ये आपला ठसा उमटवला आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या पार्श्वभूमीसह, कपूर यांनी मानसिक आरोग्य आणि वर्क-लाईफ बॅलन्स राखण्यासाठी वकिली करताना, तंत्रज्ञानाबद्दलची त्यांची आवड यशस्वी उपक्रमात बदलली.

हेही वाचा… परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास

पर्ल कपूर अवघ्या २७ व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी व्यावसायिक जगामध्ये अगदी कमी वयातच तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील एक प्रमुख उद्योजक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पर्ल कपूर यांनी लहानपणापासूनच मोठी स्वप्न पाहिली होती. तंत्रज्ञानाबद्दलची त्यांची आवड शाळेच्या काळातच दिसून आली, जिथे त्यांनी संगणक विज्ञान आणि गुंतवणूक बँकिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. पर्ल कपूर यांनी प्रतिष्ठित क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, यूके येथे इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये एमएससी केले. तिथे ब्लॉकचेन आणि फायनान्सच्या क्षेत्रांशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या भविष्याची दिशा बदलली.

२०१९ मध्ये पदवी घेतल्यानंतर, कपूर यांनी मे २०२३ मध्ये Zyber 365 ग्रुपची स्थापना केली. त्यांची कंपनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि सायबरसुरक्षा यावर लक्ष केंद्रित करते, ज्याचे उद्दिष्ट वित्त आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित, विकेंद्रित सोल्यूशन्स निर्माण करणे आहे.

हेही वाचा… ना कॉलेज, ना कोणती पदवी; वयाच्या १२व्या वर्षी कोडिंग शिकून बनला कोटींचा मालक, वाचा किशन बागरियाचा प्रेरणादायी प्रवास

Zyber 365 ग्रुपने व्हेंचर कॅपिटल स्पेसमध्ये लक्ष वेधले, मार्केट-रेडी उत्पादन लाँच करण्यापूर्वीच निधी उभारला. कपूर यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि त्यांनी जमवलेल्या टॅलेंटेड टीमकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले

संपत्ती असूनही कपूर एक सामान्य जीवनशैली जगतात आणि उद्योजकीय जगात मानसिक आरोग्य आणि वर्क लाईफ बॅलेन्सच्या महत्त्वावर जोर देतात. २०२४ पर्यंत अंदाजे १.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, Zyber 365 ग्रुपसह पर्ल कपूरचे हे यश ही फक्त सुरुवात आहे. त्यांच्याकडे नवनवीन उपक्रमांच्या योजना आहेत, ज्या भविष्यात खूप यशस्वी होऊ शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of pearl kapur indias youngest billionaire builted zyber 365 company dvr