Success story of Pratiksha Tondwalkar: स्वप्नांना वयाचं, वेळेचं बंधन नसतं असं म्हणतात. आजची प्रेरणादायक कथा आहे प्रतीक्षा तोंडवळकर यांची, ज्या एके काळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगार होत्या. त्या शौचालय आणि फर्निचर साफ करायच्या आणि आता त्या बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक (AGM) पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाच्या १७ व्या वर्षी लग्न केल्यानंतर, २० व्या वर्षी विधवा होणाऱ्या, एसबीआयमध्ये सफाई कामगार म्हणून ६० ते ६५ रुपये दरमहा कमावणाऱ्या प्रतीक्षा तोंडवळकर नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहायक महाव्यवस्थापक (AGM) पदापर्यंत पोहोचल्या. त्यांची कहाणी हे एक मोठं उदाहरण आहे की, जर तुम्ही कठीण काळातही हार न मानता परिश्रम करत राहिलात, तर एक दिवस तुम्हाला यशाचा गोड अनुभव नक्कीच मिळेल.

१७ व्या वर्षात लग्न अन् २०व्या वर्षी विधवा

प्रतीक्षा यांनी १७ व्या वर्षी आपली दहावीची परीक्षा पूर्ण होण्याच्या आधीच सादाशिव कडू यांच्याशी लग्न केलं, कारण त्यांच्या कुटुंबाच्या काही आर्थिक अडचणी होत्या. कडू मुंबईत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बुकबाइंडरचे काम करत होते. दुर्दैवाने, जेव्हा ते दोघे आपल्या गावी जात होते तेव्हा कडू एका अपघातात मरण पावले. यामुळे प्रतीक्षा यांना वयाच्या २० व्या वर्षी जगण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

हेही वाचा… शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा

एकेकाळी सफाई कामगार म्हणून करत होत्या काम (Pratiksha Tondwalkar worked as a sweeper)

शिक्षणाची कमी असल्यामुळे प्रतीक्षा यांना योग्य नोकरी मिळवण्यात अडचणी येत होत्या. त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि हायस्कूलचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सफाईचे काम करावं लागलं. त्या शौचालय साफ करत, फर्निचर पुसत आणि इतर छोटी-मोठी काम करत महिन्याला सुमारे ६०-६५ रुपये कमावत होत्या, त्याचवेळी आपल्या मुलाची काळजीही घेत होत्या. प्रतीक्षा यांना खूप मेहनत करावी लागली आणि त्या आपल्या मुलासाठी आवश्यक ते सर्व काही करत होत्या.

सफाई कामगारापासून बँक क्लार्कचे पद

प्रत्येक मोठ्या यशात संघर्ष आणि विजयाचे काही टप्पे असतात आणि प्रतीक्षा यांचं यशही यापेक्षा काही वेगळं नाही. कठीण काळात जेव्हा असं वाटत होतं की सर्व काही त्यांच्या विरोधात आहे, तेव्हा त्यांनी तक्रार केली नाही. त्यांना जाणीव होती की, जे लोक हार मानतात आणि नकारात्मक विचार करत राहतात, त्यांना कधीच उत्तर सापडत नाही, म्हणून त्या मार्ग शोधण्यासाठी झगडत राहिल्या. त्यांनी मुंबईच्या विक्रोळीतील रात्रीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, बारावीची परीक्षा पास केली आणि दुसऱ्या रात्रीच्या कॉलेजमध्ये मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली. नंतर त्यांना सफाई कामगारापासून बँक क्लार्क पदावर बढती मिळाली.

हेही वाचा… मेहनत आली फळाला! ‘या’ मुलाने हिंदी माध्यमात शिकून NEET मध्ये पटकावला पाचवा क्रमांक, देशातील टॉप कॉलेजमधून MBBS करण्याचं स्वप्न केलं साकार

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या सहायक महाव्यवस्थापक (AGM) पदावर नियुक्त

प्रतीक्षा यांनी १९९३ मध्ये पुन्हा लग्न केले. त्यांचा पती प्रमोद त्यांच्या या संघर्षात साथ देत होता आणि प्रतीक्षा यांना बँकिंग परीक्षा देण्यासाठीदेखील त्यांच्या पतीने प्रोत्साहन दिले. प्रतीक्षा यांनी परिस्थिती बदलली आणि मोठा बदल घडवला. प्रतीक्षा तोंडवळकर यांनी आपल्या कामात खूप मेहनत घेतली. परिश्रम आणि समर्पणामुळे प्रतीक्षा प्रशिक्षण /प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पदोन्नत झाल्या. नंतर त्या CGM आणि त्यानंतर AGM पदावर पोहोचल्या. प्रतीक्षा यांची सफाई कामगारापासून SBI मधील AGM पर्यंतची वाटचाल हे दाखवते की, कष्ट आणि समर्पणामुळे कसे यश गाठता येते.