एमबीबीएस कोर्स करण्यासाठी घेतलेल्या नीट वैद्यकीय परीक्षेला जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परीक्षा कठीण असते; पण अनेक उमेदवारांसाठी, त्यांची परिस्थिती ही स्वतःच एक परीक्षा असते, ज्यामुळे NEET सारख्या परीक्षा त्यांच्यासाठी आणखी कठीण होतात, अशीच प्रेरणाची कहाणी आहे, जिने अनेक अडचणींवर मात करून यश मिळवले आणि ती तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. २०२३ मध्ये प्रेरणाने AIR १०३३ रँकसह NEET मध्ये पात्रता मिळवली. चला तर मग जाणून घेऊ प्रेरणाची कहाणी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२३ मध्ये कोटाच्या प्रेरणाने मारली बाजी

भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, NEET मधील प्रेरणाची यशोगाथा खरोखरच लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. राजस्थानातील कोटा येथे तिच्या भावंडांसह राहणाऱ्या प्रेरणाला जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा धक्का बसला. याच वेळी ती NEETची तयारी करीत होती. वडिलांच्या निधनामुळे तिच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढला होता.

कर्ज फेडू न शकल्याने घर सोडावे लागले

२७ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याची जबाबदारी प्रेरणाच्या नाजूक खांद्यावर आली. तसंच तिच्यावर तिच्या चार भावंडांची काळजी घेण्याचीही जबाबदारी होती. कर्ज फेडू न शकल्यामुळे तिला घरही सोडावे लागले होते. मग कोविड-१९ साथीच्या आजाराने परिस्थिती आणखी बिकट झाली. या सगळ्याला न जुमानता, प्रेरणाने नीट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दृढनिश्चय केला.

छोट्या खोलीत १०-१२ तास केला अभ्यास

प्रेरणा इतक्या लहान खोलीत अभ्यास करायची की नीट झोपायलाही जागा नव्हती. ती दररोज १०-१२ तास अभ्यास करायची. न झोपता, न जास्त खाता पिता तिने आपली तयारी सुरू ठेवली.

५०० रुपयांच्या पेन्शनच्या आधारावर ढकलले दिवस

प्रेरणा आणि तिच्या भावंडांच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्यांच्या आईच्या नावावर मिळणारे मासिक ५०० रुपये पेन्शन. नातेवाईकही त्यांना काही मदत करीत असत. प्रेरणाकडे पैसे नव्हते म्हणून ती सायकलने किंवा पायी प्रवास करायची.

पहिल्या प्रयत्नात यश

प्रेरणाने पहिल्याच प्रयत्नात NEET परीक्षा उत्तीर्ण केली. तिने NEET २०२२ मध्ये ७२० पैकी ६८६ गुण मिळवून खूप चांगले अंक मिळवले आणि सुमारे २.५ लाख विद्यार्थ्यांमधून १०३३ वा क्रमांक मिळवला.

नीट यूजी निकाल २०२३ नंतरच्या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली की, माझे वडील माझे सर्वांत मोठे प्रेरणास्थान होते. त्यांनी मला शिकवले की, आर्थिक परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझी स्वप्ने पूर्ण करण्यापासून कोणीही मला रोखू शकत नाही.