Success Story Of Rama Murthy Thyagarajan : आपण श्रीमंत व्हावे अशी अनेकांच्या मनात इच्छा असते. श्रीमंत झाल्यावर मोठी गाडी, नवीन घर, महागडे स्मार्टफोन घेण्याची एक यादीच तयार असते, पण आज आपण अशा एका अब्जाधीशाबद्दल जाणून घेणार आहोत, जे १.१० लाख रुपये कोटी रुपयांचे मोठ्या आर्थिक साम्राज्याचे नेतृत्व करत असतानाही ते साधेपणाने राहणं पसंत करतात. तर कोण आहेत हे अब्जाधीश जाणून घेऊयात…

श्रीराम ग्रुपचे संस्थापक रामामूर्ती त्यागराजन (Success Story Of Rama Murthy Thyagarajan )हे अब्जाधीशांच्या जगात एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. १.१० लाख कोटींच्या मोठ्या आर्थिक साम्राज्याचे नेतृत्व करत असतानाही, ते साधेपणाने राहणे पसंत करतात. म्हणजेच ते सामान्य घरात राहतात, सहा लाखांची कार चालवतात आणि अगदी मोबाईल फोन वापरणेसुद्धा टाळतात. त्यांचा प्रवास हे दर्शवतो की, संपत्तीला नेहमीच भव्य जीवनशैली असण्याची गरज नसते.

vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
Success Story of Inder Jaisinghani
Success Story Of Inder Jaisinghani: शून्यातून घडविले विश्‍व! चाळीपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत… वाचा इंदर जयसिंघानी यांची गोष्ट
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
Juhi Chawala
जुही चावला बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री! चित्रपटांपासून दूर असूनही कसे कमावते पैसे? उत्पन्नाचा स्रोत काय? घ्या जाणून…

त्यागराजन यांचा प्रवास १९६० च्या दशकात सुरू झाला जेव्हा त्यांनी श्रीराम ग्रुपची स्थापना केली. श्रीराम ग्रुप लहान चिटफंड कंपनी म्हणून सुरू झाली आणि आता ती एक वित्तीय कंपनी बनली आहे. कारण- एकट्या श्रीराम यांनी फायनान्सने १.१० लाख रुपये कोटींचे बाजारमूल्य गाठले आहे. त्यांचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विमा कंपनीत काम करण्याच्या त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांमुळे घडला. तेथे त्यांनी लक्षात घेतले की, पारंपरिक बँका अनेकदा ट्रकचालक, कमी उत्पन्न मिळवणाऱ्यांसारख्या विशिष्ट गटांना सेवा देण्यास तयार नसतात.ही तफावत पाहून त्यागराजन यांनी या दुर्लक्षित समुदायांना विशेषत: व्यावसायिक वाहनांना वित्तपुरवठा करण्यावर भर देण्याचे ठरवले. त्यांची ही आर्थिक रणनीती सार्थकी लागली आणि आर्थिक साह्यासाठी इतर काही पर्याय असलेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करून कंपनीचा त्वरित विस्तार झाला. त्याचे यश श्रीमंत ग्राहकांना मदत पुरविण्यावर नाही तर दैनंदिन लोकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्यासाठी उपाय प्रदान करणे यावर आधारित आहे.

हेही वाचा… Success Story : कष्टाचे फळ मिळालेच! नांदेड ते कोटा… परीक्षेत ३५० गुणांसह पास होणाऱ्या आयआयटी-जेईई टॉपरला भेटा!

संपत्तीचे दान :

त्यागराजन यांची जीवनशैली (Success Story Of Rama Murthy Thyagarajan ) त्यांचे खऱ्या अर्थाने वेगळेपण दाखवून देते. लक्षणीय संपत्ती असूनही त्यांचा स्वभाव विनम्र आहे. स्पॉटलाइट, तांत्रिक गोष्टींपासून ते दूर राहतात. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी एकदा ७५० दशलक्ष डॉलर्सच्या कंपनीतील आपले भागभांडवल विकले आणि ते पैसे ट्रस्टला दान करण्याचे ठरवले. या निर्णयामुळे त्यांची परोपकारी वृत्ती, समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी, त्यांचे ऐषारामापेक्षा साधेपणाने राहण्यातून त्यांचे समर्पण दिसून येते.

राममूर्ती त्यागराजन यांची कथा आपल्याला शिकवते की, यशाची व्याख्या संपत्तीने न होता, सकारात्मक प्रभावाने निर्माण होते. त्यांचा नम्र स्वभाव, परंपरागत मार्गाबाहेर जाऊन विचार करण्याचे धारिष्ट्य यातून पुढे गेलेला त्यांचा प्रवास इतरांसाठी एक प्रेरणादायी (Success Story Of Rama Murthy Thyagarajan )उदाहरण बनतो.