Success Story of Richa Kar: ज्या समाजात अंतर्वस्त्रावर चर्चा करणे अनेकांना लज्जास्पद वाटते, तिथे ‘झिवामे’ची संस्थापक रिचा कारने भारतातील अंतर्वस्त्र खरेदीच्या अनुभवात क्रांती घडवून आणली आणि सामाजिक नियमांना आव्हान दिले. मात्र, रिचाच्या यशाचा मार्ग सोपा नव्हता. उद्योजकाच्या दृष्टीला कुटुंब पाठिंबा देईल, अशी सामान्य अपेक्षा असूनही रिचाला तिच्या स्वतःच्या कुटुंबाकडून, विशेषत: तिच्या आईकडून टीकेचा सामना करावा लागला. तिच्या कुटुंबाला सुरुवातीला तिच्या कामाची लाज वाटली. तिच्या मित्रांनीही तिच्या प्रयत्नांची खिल्ली उडवली. कालांतराने, तिच्या आईचा दृष्टिकोन बदलला. कारण- तिने रिचाचे व्यवसायाप्रति समर्पण आणि तिची चिकाटी पाहिली.

रिचाचा शैक्षणिक प्रवास आणि कामगिरी

१७ जुलै १९८० रोजी जमशेदपूर येथे जन्मलेल्या रिचा कारने २००७ मध्ये SVKM च्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS)मधून पदव्युत्तर डिप्लोमा केला. रिचाने सुरुवातीला आयटी क्षेत्रात काम केले, स्पेन्सर्स आणि SAP रिटेल कन्सल्टन्सीसारख्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कामे केली. NMIMS मधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, तिने भारतातील अंतर्वस्त्र किरकोळ क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रवास सुरू केला.

Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

… अन् ‘झिवामे’ केलं लाँच

२०११ मध्ये रिचाने ‘झिवामे’ लाँच केलं; ज्याचे हिब्रूमध्ये ‘रेडियंट मी’, असे भाषांतर होते. महिलांना सन्मान, गोपनीयता व अंतर्वस्त्रांची विस्तृत निवड ऑफर करण्यासाठी ‘झिवामे’ सुरू करण्यात आलं. ५,००० डिझाइन्स, ५० ब्रॅण्ड व १०० साइजेसच्या प्रभावी लाइनअपसह अंतर्वस्त्रांमधून पर्याय शोधणाऱ्या भारतीय महिलांमध्ये Zivame ब्रॅण्ड लवकर लोकप्रिय झाला.

हेही वाचा… भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

सुरुवातीला अंतर्वस्त्रांवर लक्ष केंद्रित करून, मग ‘झिवामे’नं महिलांचे कपडे, फिटनेस वेअर व स्लीपवेअर प्रकार समाविष्ट करीत आपली रेंज वाढवली. प्रॉडक्ट्स, किंमत, गुणवत्ता व ग्राहकांच्या प्रतिक्रिया या रिचाच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे खरेदीदारांमध्ये ‘झिवामे’बद्दल विश्वास निर्माण झाला. कंपनीची ग्राहक सेवा उत्कृष्ट करण्याच्या लक्ष्याची ही ओळख मजबूत करण्यात मदत झाली.

‘झिवामे’ची ऑनलाइन उपस्थिती वाढत असताना, रिचाने फिजिकल स्टोअर्स उघडून आपली पोहोच वाढवली. २०१६ मध्ये तिने झिवामे स्टुडिओ सुरू केला आणि त्यामुळे ग्राहकांना ‘झिवामे’चा चांगला अनुभव मिळाला. मग हळूहळू ‘झिवामे’नं भारतातील टियर २ आणि टियर ३ अशा शहरांमध्ये विस्तार केला.

हेही वाचा… व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास

२०१७ मध्ये रिचानं सीईओ पद सोडलं असलं तरी रिचा कार ‘झिवामे’च्या संचालक मंडळावर कायम आहे आणि कंपनीमध्ये इक्विटी राखून आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार तिची एकूण संपत्ती ७४९ कोटी रुपये आहे, जी तिचा कायमचा प्रभाव आणि ‘झिवामे’च्या यशाची ग्वाही देते; जी नंतर २०२० मध्ये ‘रिलायन्स रिटेल’नं विकत घेतली.

Story img Loader