Success Story of Rishabh Chokhani: वयाच्या २९ व्या वर्षी जेव्हा ऋषभ चोखानी यांनी उत्तम आहार घेण्यास सुरुवात केली तेव्हा शरीरावर होणाऱ्या परिणामांवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण, परिवर्तन दिसायला वेळ लागला नाही आणि शारीरिक व मानसिक, असे दोन्ही प्रकारचे परिणाम तर आश्चर्यकारक होते – .

त्यांचा कौटुंबिक व्यवसाय फार्मास्युटिकल्सचा होता. त्यामुळे त्यांना निरोगीपणा आणि संबंधित उद्योगांचा अभ्यास करणे सोपे झाले. दरम्यान, ऋषभ यांना सेंद्रिय (organic) खाद्यपदार्थ उद्योगात मोठी संधी मिळाली आणि त्याच धर्तीवर त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे २०१७ मध्ये मुंबईत नेचरव्हिब बोटॅनिकलची (Naturevibe Botanicals) सुरुवात झाली.

Success Story Of M Sivaguru Prabhakaran
Success Story Of M Sivaguru Prabhakaran : कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी सोडली नोकरी; ‘या’ संधीचे केले सोने अन् पूर्ण झाले ‘त्याचे’ आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न
Girish Mathrubootham Former CEO of Freshdesk 12th fail businessman who earned 334 crore rupees just in seven days know his success story
७ दिवसात ३४० कोटींची कमाई! बारावी नापास झालेली…
Who is Samir Dombe
Success Story: इंजिनीअरची नोकरी सोडून सुरू केली शेती; वर्षाला कमावतो लाखो रुपये
Chemistry and Botany career loksatta
करिअर मंत्र
agriculture career opportunities loksatta
मातीतलं करिअर : शेतीतील संधी
rbi junior engineer recruitment loksatta news
नोकरीची संधी : आरबीआयमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची भरती
mpsc comfort zone loksatta
MPSC मंत्र : ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर
JEE Main 2025 Schedule Released For Joint Entrance Exam Session 1
JEE Main 2025च्या संयुक्त प्रवेश परीक्षा सत्र एकचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होईल परीक्षा
Success Story rakesh
Success Story : परिस्थितीने खचला नाही; मित्रांच्या मदतीने आर्थिक परिस्थितीवर मात करून उत्तीर्ण केली CA परीक्षा

“भारतात त्या वेळी सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ अजूनही वाढत होती. मात्र, अमेरिकेत त्याची आधीच मोठी क्रेझ होती. कोणत्याही उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक नैसर्गिक घटकांची मुळे भारतात असली तरी परदेशी बाजारपेठेत फारच कमी भारतीय पुरवठादार (Suppliers) होते आणि म्हणूनच ही जागा मला सोडायची नव्हती”, असे ऋषभ यांनी SMBStoryला सांगितले.

हेही वाचा… Success Story: वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पठ्ठ्याने सुरु केला स्वत:चा चहाचा ब्रॅंड; आज १०४ देशांमध्ये होतेय विक्री

जेव्हा ऋषभ यांनी हा ब्रॅण्ड लाँच केला तेव्हा यूएस मार्केटपासून त्यांनी सुरुवात केली आणि लवकरच ब्रॅण्डचा विस्तार युरोपमध्ये झाला. त्या परदेशी बाजारपेठांमध्ये काम केल्यानंतर आणि उद्योगाची माहिती घेतल्यानंतर ऋषभ यांनी २०१९ मध्ये भारतात प्रवेश केला.

Naturevibe Botanicals मध्ये सुपरफूड सेंद्रिय अन्न, आयुर्वेदिक सप्लिमेंट्स, स्टेपल्स, किराणा माल, आवश्यक तेले, मसाज ऑइल इत्यादींचा समावेश आहे. ६५० पेक्षा जास्त श्रेणींतील उत्पादने, रायगड, महाराष्ट्र येथे असलेल्या त्यांच्या सोईच्या ठिकाणी तयार केली जातात.

आज ऋषभ यांचा दावा आहे की, कंपनी २५० कोटी रुपयांच्या भारतीय वनस्पती निर्यात करते आणि ४० टक्के जागतिक ग्राहक टिकवून ठेवण्याच्या दरासह आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये १४० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

कोविड-१९ मुळे मिळाली नवी संधी

भारतात ऑपरेशन्स सुरू केल्यानंतर एक वर्षानंतर देशात कोविड-१९ मुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक व्यावसायिकांचे कामकाज ठप्प झाले.

२०१९ मध्ये जेव्हा ऋषभ यांनी देशात आपला व्यवसाय सुरू केला होता, तेव्हा त्यांनी Amazon द्वारे आपले प्रॉडक्ट्स विकण्यास सुरुवात केली होती. तथापि, लॉकडाऊनमुळे ईकॉमर्स प्लॅटफॉर्मकडील बहुतेक पिनकोड्स अकार्यक्षम झाले होते. म्हणून ऋषभ यांनी जुलै २०२० मध्ये स्वतःचे D2C मॉडेल सेट करण्यास सुरुवात केली; जेणेकरून विक्रेता ग्राहकांपर्यंत थेट प्रॉडक्ट्स पोहोचवू शकेल.

“Amazon हे भारत आणि यूएस या दोन्ही ठिकाणी आमचे प्राथमिक विक्री चॅनेल आहे; परंतु महामारीमुळे आम्हाला D2C मार्केटमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. आता आमच्या वेबसाइटवर दिलेल्या ऑर्डर्सची संख्या Amazon वरून दिलेल्या ऑर्डर्सइतक्याच आहेत.” असं ऋषभ यांनी SMBStory ला सांगितलं.

ऋषभ असंही म्हणाले, “साथीच्या रोगाच्या काळात जेव्हा बहुतेक कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत होत्या, तेव्हा आमचा व्यवसाय थांबला नाही म्हणून आम्ही अधिक लोकांना कामावर घेण्याच्या दृष्टीने शोधात होतो.”

दरम्यान, या कंपनीने Amazon Smbhav Summit २०२१ मध्ये ‘जॉब क्रिएटर ऑफ द इयर’ ही पदवी जिंकली.

Story img Loader