Success story: मुंबईच्या चाळीतून आपण थेट रिअल इस्टेटच्या शिखरावर पोहोचू, असा अंदाज वा स्वप्न फार कमी लोकांनी पाहिलं असेल. भारतात असे अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशस्वी व्यावसायिकाची यशोगाथा सांगणार आहोत; जे एकेकाळी मुंबईत राहून छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत होते. पण, आता दुबईत त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये जन्मलेल्या रिझवान साजन यांचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय होते. त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीमुळे त्रस्त होते. वडिलांच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतर लॉटरीतून मिळालेल्या पैशाने कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. आपल्या भावंडांसाठी १५ रुपयांच्या पॉकेटमनीसह साजन यांनी आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात योगदान देण्याचे मार्ग शोधले. त्यांनी शालेय पुस्तकांची विक्री, घरोघरी जाऊन दूध देणे, सणासुदीच्या वस्तू विकण्याचे काम त्यांनी सुरू केले.

Success Story Of Rama Murthy Thyagarajan In Marathi
Success Story : ना आलिशान गाडी, ना मोबाईलचा वापर; कोटींची संपत्ती असून साधेपणाने जगतात आयुष्य; वाचा रामामूर्ती यांचा प्रवास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
Nirmala shekhawat Success Story
Women Success Story : पतीचा मृत्यू आणि लॉकडाऊन…तीन मुलांच्या पालनासाठी व्यवसायाची सुरुवात; आज ३० महिलांचे कुटुंब सांभाळते ही महिला

पण, त्यांच्या नशिबात काही वेगळचं लिहून ठेवलं होतं. साजन हे १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारावी लागली. आपल्या दिवंगत वडिलांच्या बचतीतून अल्प कर्ज घेऊन त्यांनी एक माफक बॉक्स फाइल्सच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांना यश मिळालं, तरी त्याच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी ते पुरेसं नव्हतं.

हेही वाचा…SBI SCO Recruitment 2024: एसबीआय SCO भरती ! कसा कराल अर्ज, कशी होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

पण, जेव्हा साजनच्या काकांनी त्यांना कुवेतमध्ये नोकरीची ऑफर दिली तेव्हा त्यांच्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण वळण आलं. ही संधी त्यांच्यासाठी संजीवनी ठरली. कुवेतमधील नोकरीमध्ये मिळणाऱ्या पगारातून त्यांनी नंतर टोयोटा लॅण्ड क्रूझर, वांद्रे येथे घर खरेदी केलं आणि आपल्या बहिणीचं लग्नही लावून दिलं. पण, १९९० मधील आखाती युद्धानं त्यांना कुवेतमधून मुंबईला परत आणलं आणि त्यांना पुन्हा एकदा तळाशी आणलं.

आपले नशीब फिरवण्याचा निर्धार करून, साजन १९९३ मध्ये दुबईला गेले. जिथे त्यांनी एक ट्रेडिंग फर्म स्थापन केली. त्यांच्या व्यवसायातील हुशारीमुळे त्यांना बांधकाम साहित्य, सॅनिटरी सोल्युशन्स, घराचं सामान आणि बरेच काही यांमध्ये उपक्रम स्थापन करण्यास प्रवृत्त केले. २०१४ मध्ये डॅन्यूब प्रॉपर्टीज लाँच करून त्याने रिअल इस्टेटमध्ये पाऊल टाकले.

रिअल इस्टेटकडे साजनचा दृष्टिकोन, विशेषत: त्याच्या एक टक्के मासिक पेमेंट योजनेने बाजारात क्रांती घडवून आणली. इमारत पूर्ण होईपर्यंत खरेदीदारांना प्रत्येक महिन्याला मालमत्तेच्या किमतीच्या फक्त एक टक्का रक्कम भरण्याची परवानगी दिली. या उपक्रमाचे उद्दिष्ट भाडेकरूंना घरमालकांमध्ये रूपांतरित करणे, उच्च श्रेणीतील मालमत्तेसाठी सुलभता वाढवणे असे होते. ही रणनीती यशस्वी ठरली, ज्यामुळे अनेकांसाठी घरमालकीचा मार्ग लक्षणीयरीत्या सुलभ झाला. साजन यांना भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये आव्हानांचा सामना करावा लागला. पण, अपार मेहनत आणि प्रामाणिकपणे कष्ट करीत त्यांनी आपल्या कंपनीला शिखरावर नेऊन ठेवले. त्यामुळे आजच्या घडीला रिअल इस्टेट क्षेत्रात रिझवान साजन यांचं नाव आदरानं घेतलं जातं.