Success Story: सामान्य जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, हे नागरी सेवकाचे मुख्य काम आहे. त्यामुळे नागरी सेवक म्हणून देशाची सेवा करणे हे आपल्यातील अनेकांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नुकताच यूपीएससी परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर केला. तर आज आपण अशाच एका आयएएस अधिकारी यांचा प्रवास पाहणार आहोत ; जे सुरवातीला मेडिकलचे विद्यार्थी होते. पण, नंतर त्यांनी अभ्यास करून, मेहनतीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चला तर या लेखातून त्यांचा प्रवास सविस्तर जाणून घेऊ या…

मदुराई, तामिळनाडू येथील रहिवासी एस प्रशांत (S. Prashanth) एमबीबीएसचा विद्यार्थी होते. त्यांचे शालेय शिक्षण गोपालपूरमच्या D.A.V. माध्यमिक विद्यालयात (बॉईज स्कूल) मध्ये झाले (Boys Senior Secondary School). त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाल्यास जेव्हा ते १२वीत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या आईने कठोर परिश्रम करून कुटुंबाचा खर्च उचलला.

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’

हेही वाचा…Success Story: एकेकाळी राहिले चाळीत, पोटापाण्यासाठी विकलं दूध; गरिबीतून मार्ग काढत परदेशात उभारलं स्वतःचं साम्राज्य; वाचा रिझवान साजन यांची गोष्ट

प्रशांत यांनी शालेय शिक्षणानंतर नीट परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि मद्रासच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एका मुलाखतीत त्याने नमूद केले की, तो वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वेळा परीक्षांमध्ये टॉपर राहिले आहेत आणि त्याने ३६ मेडल्ससुद्धा पटकावले आहेत.

युपीएससी स्पर्धा परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण:

प्रशांत यांनी वैद्यकीय अभ्यासाबरोबर यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू केली होती. युपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल सांगताना ते म्हणाले की, त्यांना नेहमीच देशाची सेवा करायची होती आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकणाऱ्या धोरणाचा भाग व्हायचा होते; त्यामुळे त्यांनी खूप अभ्यास केला आणि यूपीएससी सीएसई २०२३ मध्ये AIR ७८ रँक मिळवला.

सुरवातीला डॉक्टर म्हणून सेवा करत असताना ते दिवसाला ६० ते ७० रुग्णांना भेटायचे. पण, जर ते नागरी सेवक झाले तर ते लाखो लोकांची सेवा करू शकतात असे त्यांचे मत होते. त्यांनी पुढे सांगितले की, ते इंडियन मेडिकल असोसिएशन आणि युनेस्को बायोएथिक्स कौन्सिलच्या राज्य शाखेचा भाग होते ; त्यामुळे ते नागरी सेवक होण्यासाठी प्रेरित केले. जेव्हा प्रशांत यांना त्यांच्या यशामागचे रहस्य विचारले तेव्हा ते म्हणाले की, “नान मुधलवन योजनेमुळे त्यांना युपीएससी परीक्षेची तयारी करण्यात खूप मदत झाली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्याची आजी जयलक्ष्मी, आई शांती रामकृष्णन, त्यांचे शिक्षक आणि काही आयएएस ऑफिसर्सना आदी मार्गदर्शकांना दिल आहे. कारण – त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांना हा टप्पा गाठता आला ; असे ते म्हणाले आहेत.