Success Story Of Safin Hasan In Marathi : केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. या परीक्षांद्वारे तुमची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) यांसारख्या भारत सरकारमधील विविध उच्चस्तरीय पदांवर तुमची नियुक्ती करण्यात येते. अनेक वर्षांमध्ये, अनेक व्यक्तींनी त्यांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि लाखो लोकांना प्रेरणा दिली. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट म्हणजे भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी सफीन हसन यांची, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली (Success Story).
सफीन हसन यांचा जन्म १९९५ मध्ये गुजरातमधील पालनपूरमध्ये एका गरीब कुटुंबात झाला. मर्यादित सामग्री असूनही त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांची आई स्वयंपाकी म्हणून, तर वडील दिवसा विटा वाहून नेण्याचे काम करीत असत आणि संध्याकाळी उदरनिर्वाहासाठी उकडलेली अंडी विकण्यासाठी ते स्टॉल लावायचे. २००० सालापासून कुटुंबाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. जेव्हा दोन्ही पालकांनी डायमंड युनिटमधील नोकऱ्या गमावल्या, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक संघर्षात भर पडली.
हेही वाचा…कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळेला भेट (Success Story)
अडचणी होत्याच, सफीन हसन हे शाळेत हुशार विद्यार्थी होते; म्हणून त्यांना एसकेएम हायस्कूलने पाठिंबा दिला आणि इयत्ता ११ वी, १२ वीची फी माफ केली. नागरी सेवांमध्ये सामील होण्याची इच्छा तेव्हा त्यांच्या मनात आली, जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शाळेला भेट दिली. अधिकाऱ्याला मिळालेल्या आदर आणि कौतुकाने तरुण सफीनवर छाप सोडली आणि त्याला प्रतिष्ठित यूपीएससी परीक्षेचे ध्येय गाठण्यास प्रेरित केले.
नातेवाईकांच्या पाठिंब्याने सफीनने कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पण, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे ठरवले. सफीन हसन यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जाताना अपघातात गंभीर जखमी झाले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. दुखापतग्रस्त असूनही ते परीक्षेला बसले आणि नंतर त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपी करण्यात आल्या. त्यानंतर परीक्षेचा निकाल लागला आणि त्यांना अखिल भारतीय रँक (AIR) ५७० मिळाली. आज सफीन हसनची चिकाटी आणि समर्पणाची कहाणी लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहे, जे अडथळ्यांवर मात करून त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा बाळगतात (Success Story).