Success story of Sahil Pandita: साहिल पंडिता यांनी लहानपणी अनेक चढउतार पाहिले. अगदी ५,२०० रुपयांच्या नोकरीपासून सुरुवात करून, हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात कठोर परिश्रम आणि समर्पण करून, त्यांनी २.५ कोटी रुपये कमाई करणारी प्रोमिलर ही कंपनी स्थापन केली. प्रोमिलर ही हॉटेल मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. ही कंपनी हॉटेल मालकांना सल्लागार सेवा प्रदान करते. यानिमित्ताने, साहिल पंडिता यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अडचणीत गेले बालपण

साहिल पंडिता यांचा जन्म एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरादरम्यान त्यांच्या कुटुंबालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. श्रीनगरमधील सरकारी बँकेत काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांचीही नोकरी गेली. अनेक ठिकाणी राहिल्यानंतर त्यांचे कुटुंब चंदीगडजवळील एका गावात स्थायिक झाले. लहानपणापासूनच साहिल यांना अभ्यासात कमी आणि व्यावहारिक गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यांना घराबाहेर वेळ घालवायला आवडत असे. दहावीनंतर त्यांनी शाळा सोडली. यामुळे त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांना धक्का बसला. मात्र, त्यांच्या पालकांनी त्यांना पुण्यात मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमासाठी दाखल केले. मात्र, तीन महिन्यांनंतर त्यांनी तेही सोडले.

५२०० रुपयांची नोकरी केली

२०११ मध्ये, साहिल पंडिता यांचे पालक हुबळी, कर्नाटक येथे राहायला गेले. साहिल यांनीही पुणे सोडले आणि ते कुटुंबासह राहू लागले. तेथे त्यांनी एनआयओएसमधून बारावी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण, पैसे कमवण्याची त्यांची इच्छा इतकी प्रबळ होती की, पुस्तके विकत घेण्यापूर्वीच त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना कॉल सेंटरची नोकरी आवडली कारण ते इंग्रजी बोलण्यात पटाईत होते. मात्र, हुबळी येथील क्लार्क्स इन हॉटेलमध्ये वृत्तपत्रात नोकरीची जाहिरात पाहिल्यानंतर त्यांनी तिथे प्रयत्न करण्याचे ठरवले. कोणताही अनुभव नसताना त्यांना हॉटेल ऑपरेशन ट्रेनी प्रोग्राममध्ये ५,२०० रुपये प्रति महिना पगारावर नियुक्त करण्यात आले.

भांडी धुतली, टॉयलेट साफ केले

हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या बॅग्स नेणे, हाउसकीपिंगची सेवा देणे, बेड साफ करणे, भांडी धुणे, भाजी कापणे, टॉयलेट साफ करणे अशी सर्व कामे साहिल यांना करावी लागत होती. नंतर त्यांनी हॉटेल डेनिसनमध्ये अशीच नोकरी केली आणि चांगल्या संधींच्या शोधात बेंगळुरूला गेले. २०१२ मध्ये, त्यांना ITC हॉटेल्समध्ये फ्रंट-ऑफिस असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. बेंगळुरूमध्ये भाड्याच्या समस्येमुळे, त्यांना फक्त एक बाथरूम असलेल्या खोलीत १४ मुलांसोबत राहावे लागले. तिथे ढेकूणदेखील खूप होते. १४-१५ तासांच्या शिफ्टनंतर त्यांना पुन्हा त्या खोलीत जायचे नव्हते आणि ते हॉटेलच्या बंकरमध्ये (तळघर अथवा आश्रयासाठी जमिनीखाली बनवलेली जागा) झोपू लागले.

अनेक ठिकाणी काम करून सुरू केली कंपनी

आयटीसी हॉटेल्समध्ये काम करताना साहिल यांनी हॉटेलच्या इतर विभागांच्या कामकाजाचीही माहिती घेतली. त्यांची मेहनत आणि समर्पण पाहून व्यवस्थापनाने त्यांना आयटीसी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात आले. हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यासोबतच स्टायपेंड आणि दिवसातून तीन वेळचे जेवणही उपलब्ध होते. यानंतर ते आयटीसी हॉटेल्सच्या वेलकम लीड प्रोग्राममध्ये सामील झाले. त्यानंतर, २०१४ मध्ये, त्यांना हयात रीजेंसी, दिल्ली येथे ३०,००० रुपये मासिक पगारासह टीम लीड म्हणून नोकरी मिळाली. चार महिन्यांतच त्यांना पदोन्नतीने मॅनेजर फ्रंट ऑफिसमध्ये बदलण्यात आले. त्यानंतर त्यांनी हयात सोडले आणि जानेवारी २०१६ मध्ये ते ताज हॉटेल्समध्ये ड्युटी मॅनेजर म्हणून रुजू झाले.

डिसेंबर २०१६ मध्ये, वयाच्या २२ व्या वर्षी, साहिल यांना एका नामांकित मालमत्ता व्यवस्थापन फर्ममध्ये नोकरी मिळाली. त्यांचे काम एकाधिक मालमत्तेचे डेटा हॅंडलिंग, वित्त व्यवस्थापन आणि ऑडिट सुनिश्चित करणे हे होते. या क्षेत्रातील चांगला अनुभव घेतल्यानंतर साहिल यांनी जानेवारी २०१८ मध्ये ‘प्रोमिलर’ची स्थापना केली. ही एक हॉटेल मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.