Success Story Of La Pino’z Pizza Brand In Marathi : भारतात पिझ्झा उद्योगात डोमिनोज, पिझ्झा हट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व होतं. पण, या दिग्गजांना आव्हान देण्यासाठी एक स्थानिक ब्रॅण्ड मार्केटमध्ये आला आणि त्यानंही स्वतःचं नाव प्रसिद्ध केलं. या ब्रॅण्डचं नाव आहे ‘ला पिनोझ पिझ्झा’ (La Pinoz Pizza). हा ब्रॅण्ड आपल्या ग्राहकांना पिझ्झाचा अनोखा अनुभव देण्यासाठी ओळखला जातो. तर, आज आपण या ब्रॅण्डची स्थापना कोणी केली? ‘ला पिनोझ पिझ्झा’ सुरू करण्याचा त्यांच्या एकंदरीत प्रवास (Success Story Of Sanam Kapoor) कसा होता ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ला पिनोझ पिझ्झा या ब्रॅण्डची स्थापना २०११ मध्ये चंदिगड येथील सनम कपूर यांनी केली (Success Story Of Sanam Kapoor) . सनम कपूर यांना त्यावेळी लोकप्रिय पिझ्झा आउटलेटपेक्षा काहीतरी वेगळे तयार करायचे होते. याच महत्त्वाकांक्षेमुळे त्यांनी चंदिगडमध्ये ‘ला पिनोझ पिझ्झा’ लाँच केला. सनमचा प्रवास सुरू झाला जेव्हा त्यांनी आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतःची आयटी नोकरी (IT job) सोडण्याचा निर्णय घेतला. मध्यमवर्गीय कुटुंबातून जन्मलेल्या सनम कपूरचं नोकरी सोडणं हे एक धाडसी पाऊल होतं. त्यातच ‘ला पिनोझ पिझ्झा’ उघडून, ते आधीच लोकप्रिय पिझ्झाच्या मार्केटमध्ये उतरणार होते; पण त्यांना स्वतःवर खूप जास्त विश्वास होता.

लोकप्रिय ब्रॅण्डच्या मार्केटमध्ये कसे उभे राहायचे हे सनमच्या प्रमुख आव्हानांपैकी एक होते. ‘ला पिनोझ पिझ्झा’ वेगळं कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनोख्या कल्पना विकसित केल्या. केवळ संपूर्ण पिझ्झा विकण्याऐवजी त्यानं स्लाइसद्वारे विविध प्रकारचे पिझ्झा ऑफर करण्याची संकल्पना मांडली. त्यामुळे ग्राहकांना एकाच पिझ्झामध्ये विविध फ्लेवर्सचा आनंद घेता येईल. ही कल्पना ग्राहकांच्या पसंतीस उतरली आणि या नवीन संकल्पनेचं कौतुक करण्यात आलं (Success Story Of Sanam Kapoor) .

हेही वाचा…Success Story : स्पर्धात्मक परीक्षेत टॉप १० मध्ये येण्याचे स्वप्न, जेईई ॲडव्हान्स्डमध्ये मिळवले ३३७ गुण; वाचा सर्वेश मेहतानीचा प्रवास

ब्रॅण्डचे ६०० हून अधिक आउटलेट्स

सनम यांनी हेदेखील ओळखलं की, भारतात प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी चव आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘ला पिनोज’मध्ये विविधता आणण्यासाठी प्रत्येक राज्याच्या खास चवीचे पिझ्झा तयार केले (Success Story Of Sanam Kapoor) . तसेच तरुण मंडळी हे सनम यांचे लक्ष्य होते आणि त्यामुळे त्यांनी ताजे आणि परवडणारे पिझ्झा ठेवून शाकाहारी पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या निर्णय घेतला. त्यामुळे अनेक ग्राहक आकर्षित झाले.

आज ‘ला पिनोझ पिझ्झा’ भारतीय पिझ्झा उद्योगातील एक खास नामांकित ब्रँड बनला आहे. आज या ब्रॅण्डचे ६०० हून अधिक आउटलेट्स आहेत. हा ब्रॅण्ड केवळ भारतातच लोकप्रिय नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने १,००० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. सनम कपूरचा आयटी कर्मचारी ते यशस्वी पिझ्झा ब्रॅण्ड मालकापर्यंतचा प्रवास नावीन्यपूर्ण, कठोर परिश्रम व स्थानिक अभिरुची समजून घेण्याची शक्ती दर्शवतो, असे म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of sanam kapoor in marathi who launched la pinoz pizza in chandigarh must read asp