Success Story Of Sarfaraz In Marathi : मेहनत केली की फळ मिळतेच याची प्रचिती अनेक जण आपल्या यशाच्या माध्यमातून देत असतात. त्यामुळे मोठी स्वप्नं पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी ते स्वत:ला पूर्णपणे झोकून देतात. तर असंच काहीसं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा विडा एका तरुणाने उचलला. कोणत्याही सुविधा नसताना, कोणताही क्लास नसताना करोना महामारीच्या काळात त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. तर कोण आहे ही व्यक्ती, चला जाणून घेऊ (Success Story Of Sarfaraz)…

नीट २०२४ (NEET 2024) च्या परीक्षेत ७२० पैकी ६७७ गुण मिळवून पश्चिम बंगालमधील २१ वर्षीय कामगार सरफराज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. एकेकाळी सरफराज दिवसाला ४०० विटा उचलून केवळ ३०० रुपये कमवत असायचे. असे असले तरीही सरफराजने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. फिजिक्स वल्लाहचे संस्थापक अलख पांडे यांनी सरफराजचा अविश्वसनीय प्रवास व्हायरल व्हिडीओत हायलाइट केला आहे.

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Success Story of Inder Jaisinghani
Success Story Of Inder Jaisinghani: शून्यातून घडविले विश्‍व! चाळीपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत… वाचा इंदर जयसिंघानी यांची गोष्ट
Savita Malpekar On Kiran Mane
“चॅनेलने किरणला ४ वेळा वॉर्निंग दिली, मग काढलं” मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? सविता मालपेकरांनी स्पष्टच सांगितलं…
Success Story Of Manmohan Singh Rathore
Success Story Of Manmohan Singh Rathore: आईसाठी सोडली सैन्याची नोकरी, एका सहलीने बदललं आयुष्य; वाचा मनमोहन सिंग राठोड यांची परिश्रम अन् समर्पणाची गोष्ट

आमच्या घराला पूर्वी छत नव्हते

गेल्या दोन वर्षांपासून सरफराजची खडतर दिनचर्या सुरू होती. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत मजुरीच्या ठिकाणी काम केले. त्यानंतर उर्वरित वेळ अभ्यासासाठी समर्पित केला. इतरांनी त्यांच्यावर खूपदा संशय घेतला, तरीही त्यांचा दृढनिश्चय, लवचिकता मजबूत होती(Success Story Of Sarfaraz). सरफराजच्या आईने त्यांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी थंडीच्या दिवसात रात्री झोपेचा त्याग करून, लहानशा घरात अभ्यास करण्यास मदत केली. हे घरसुद्धा पीएम आवास योजनेंतर्गत बांधण्यात आले होते. लेकाच्या यशाबद्दल सांगताना आई म्हणाली की, “आमच्या घराला पूर्वी छत नव्हते आणि त्याला थंडी जाणवू नये म्हणून मी जागी राहायची.

हेही वाचा…Success Story Of Sabeer Bhatia: ईमेल कंपनी विकली मायक्रोसॉफ्टला; पर्सनल लाईफमुळे अनेकदा आले चर्चेत, कोण आहेत अब्जाधीश सबीर भाटिया?

व्हिडीओ नक्की बघा…

कोलकाता येथील प्रतिष्ठित निल रतन सरकार मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलमध्ये (NRS) प्रवेश मिळाल्यावर सरफराजच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ मिळाले. दहावीनंतर त्याने एनडीएमध्ये सामील होण्याचे स्वप्न पाहिले. पण, आर्थिक परिस्थिती आणि गंभीर अपघातामुळे त्याने ते स्वप्न त्यावेळी अर्धवट सोडून दिले. करोना महामारीच्या काळात, सरफराजला फोन खरेदी करण्यासाठी सरकारी मदत मिळाली, जो सरफराजसाठी गेम चेंजर ठरला. त्याने अलख पांडे यांच्या मोफत यूट्यूब व्हिडीओद्वारे अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि नंतर परवडणाऱ्या फिजिक्स वल्ला कोर्समध्ये प्रवेशसुद्धा घेतला.

NEET च्या पहिल्या प्रयत्नात त्याने डेंटल महाविद्यालयात प्रवेश तर घेतला, पण वसतिगृहाच्या सुविधांच्या अभावामुळे तो पुढे जाऊ शकला नाही. पण, त्याने हार न मानता २०२४ मध्ये पुन्हा प्रयत्न केले आणि यश मिळवले. अलख पांडे त्याच्या समर्पणाने प्रभावित होऊन, सरफराजच्या घरी गेला आणि त्याला एक नवीन फोन भेट दिला. परतफेड करण्यायोग्य कर्ज म्हणून पाच लाख रुपयेसुद्धा दिले आणि त्याच्या कॉलेजची फी भरण्याचे वचन दिले. तर अशी आहे सरफराजची प्रेरणादायी कथा(Success Story Of Sarfaraz).