Success Story Of Satvat Jagwani : अनेक विद्यार्थी एखाद्या नामांकित संस्थेमधून इंजिनियरिंग शिक्षण पूर्ण करून, इंजिनियरिंग विश्वात आपले भविष्य घडवू पाहतात. जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्सच्या परीक्षेत ते चांगले गुण मिळवून आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. कारण- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) पदवीधर जागतिक स्तरावरील काही सर्वांत मोठ्या तंत्रज्ञानासंबंधीच्या कंपन्यांमध्ये आघाडीवर आहेत. IIT मधून यशस्वी होऊन बाहेर पडणारे बहुतांशी विद्यार्थी लक्षवेधी अशा मोठ्या पगाराच्या ऑफर प्राप्त करतात (Success Story), अशी या संस्थेची ख्याती आहे. त्यामुळे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चुरशीची स्पर्धा असते. दरवर्षी, लाखो उमेदवार यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना जीवनातील एकापेक्षा अधिक वर्षे परीक्षा देण्यातच व्यतीत करावी लागतात. पण, केवळ काही निवडक उमेदवारांना त्यांनी स्वप्न पाहिलेल्या IIT मध्ये प्रवेश मिळतो.
पण, आज आपण अशा एक उमेदवाराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत दुसरा मार्ग निवडला. सत्वत जगवानी असे या उमेदवाराचे नाव आहे (Success Story). सत्वत जगवानी (Satvat Jagwani) यांनी जेईई ॲडव्हान्स २०१५ (JEE Advanced 2015 ) मध्ये ऑल इंडिया रँक (AIR 1) मिळवून, आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळवला. मात्र, दोन वर्षांनी त्यांनी आयआयटी बॉम्बे सोडून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)मध्ये जायचे ठरवले.
निर्णयाबद्दल बाळगले मौन (Success Story)
जगवानी यांच्या आयआयटी बॉम्बे सोडण्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्यचकित केले. पण, असा हा निर्णय घेणारे ते पहिलेच नाहीत. याआधी टॉप स्कोअरर चित्रांग मुरडिया, ज्यांनी जेईई ॲडव्हान्स २०१४ मध्ये ऑल इंडिया रँक (AIR 1) मिळवली, तेदेखील आयआयटी बॉम्बेमधून एमआयटीमध्ये भौतिकशास्त्राची पदवी घेण्यासाठी निघून गेले. मुरडिया यांनी त्यांच्या या निर्णयाची उघडपणे चर्चा केली होती. पण, जगवानी यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल मौन बाळगले आहे.
टॉप रँक केल्यानंतर, जगवानी यांनी Quora अकाउंट आणि एक यूट्यूब चॅनेल उघडले. त्यांनी इच्छुक आयआयटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोग्रामिंगचे ज्ञान (programming knowledge) त्यांच्याबरोबर शेअर केले. त्याच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, त्यांनी २०२० मध्ये एमआयटीमधून संगणक, विज्ञान व अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर त्याच संस्थेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली (Success Story) . ते सध्या २०२१ मध्ये आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याने स्थापन केलेली सॉफ्टवेअर कंपनी Cadence Design Systems येथे सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट इंजिनीयर (Software Development Engineer ) म्हणून कार्यरत आहेत.