Success Story Of Satyam Kumar In Marathi : युपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. पण, त्याहून कठीण परीक्षा म्हणजे आयआयटी जेईई ( IIT JEE). पण, एखादी गोष्ट मिळविण्याची जिद्द असेल तर ती मेहनत, चिकाटीच्या जोरावर साध्य करता येते. तर हेच खरं करून दाखवलं १३ वर्षांच्या एका मुलाने. कोण आहे हा हुशार विद्यार्थी जाणून घेऊया (Success Story Of Satyam Kumar)…

सत्यम कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वयाच्या १३ व्या वर्षी आयआयटी जेईई या भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक तो उत्तीर्ण झाला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला अत्यंत कठीण स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय अशी पदवी मिळाली.

Hyundai shares disappoint investors
ह्युंदाईच्या समभागाकडून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा; पदार्पणालाच ७ टक्के घसरणीने तोटा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Student Fell From Hotel third Floor
Hyderabad : मित्राच्या वाढदिवसाला गेला, कुत्र्यासोबत खेळता खेळता तोल गेला अन्…; ‘त्या’ हॉटेलमध्ये विद्यार्थ्याबरोबर घडलं अघटित!
Sunil Gavaskar react on Sarfaraz Khan
Sarfaraz Khan : सर्फराझ खानच्या फिटनेसबाबत माजी खेळाडू सुनील गावस्करांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘त्याच्या कंबरेपेक्षा त्याचे…’
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
school bus accident thailand
स्कूलबसची सुरक्षा ऐरणीवर; थायलंडच्या दुर्देवी घटनेनंतर दक्षिण आशियात ठरतोय काळजीचा विषय
fruit vendor in Bhandara assaulted minor boy in his godown few days ago
संतापजनक ! अल्पवयीन मुलासोबत गोडाऊनमध्ये केले अनैसर्गिक कृत्य ; अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Texts owner Kishan Bagaria success story of building 400 crore from learning coding
ना कॉलेज, ना कोणती पदवी; वयाच्या १२व्या वर्षी कोडिंग शिकून बनला कोटींचा मालक, वाचा किशन बागरियाचा प्रेरणादायी प्रवास

सत्यमचा प्रवास २०११ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्याने वयाच्या १२ व्या वर्षी पहिल्यांदा आयआयटी जेईई परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात त्याने ८,१३७ ची ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली, पण तो या यशाने समाधानी नव्हता. मग त्याने पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याला ६७९ ची उच्च रँक मिळाली. पण, त्याच्या दृढनिश्चयाने त्याला आणखी पुढे ढकलले आणि २०१३ मध्ये त्याने त्याचे स्थान ६७० व्या क्रमांकापर्यंत आणून पोहचवले. तीन वर्षांतील या सुधारणेने त्याची स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द दर्शवली.

हेही वाचा…Success Story : पुण्यातून मिळाली मदत, कामगारांसाठी सुरू केला पहिला ऑनलाइन चौक; वाचा चंद्रशेखर मंडल यांचा प्रवास

इंजिनिअरिंगमध्ये BTech-MTech ड्युअल डिग्री (Success Story Of Satyam Kumar) :

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या सत्यमचे सुरुवातीचे आयुष्य सोपे नव्हते. आयआयटी-जेईईच्या तयारीसाठी तो कोटा, राजस्थान येथे गेला, जिथे त्याने तेथील सुप्रसिद्ध कोचिंग सेंटरमध्ये अभ्यास केला. लहान वयात त्याने तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेबद्दलची आवड दाखवून फेसबुकसारखे काहीतरी क्रांतिकारक घडवायचे आहे असे सांगितले.

आयआयटी-जेईई उत्तीर्ण केल्यानंतर सत्यमने आयआयटी कानपूर, भारतातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech-MTech ड्युअल डिग्री घेतली. त्यानंतर त्याच्या शिकण्याची आवड त्याला युनायटेड स्टेट्समध्ये घेऊन गेली, जिथे त्याने वयाच्या २४ व्या वर्षी पीएचडी मिळवली. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, सत्यमने ॲपलमध्ये मशीन लर्निंग इंटर्न म्हणून इंटर्नशिप केली आहे आणि सध्या करिअरच्या नवीन संधी तो शोधत आहे.

सत्यम कुमारची प्रेरणादायी कथा (Success Story Of Satyam Kumar) हे सिद्ध करते की, महान गोष्टी साध्य करण्यासाठी वय किंवा पार्श्वभूमी तुमच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात कधीच अडथळा नसते. तसेच त्याचा प्रवास असंख्य विद्यार्थ्यांना प्रेरित करतो आहे आणि त्यांना आठवण करून देतो की कठोर परिश्रम, चिकाटी एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते.