Success Story of Satyam Sundaram: मूळचा बिहारच्या असलेल्या सत्यम सुंदरमने बांबूपासून बनवलेले पदार्थ बनवून आपले नशीब बदलले. एमबीए करताना त्याला बांबू उद्योगाची क्षमता कळली. त्यानंतर त्याने ‘मणिपुरी बांबू आर्टिफॅक्ट्स’ नावाचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. रस्त्याच्या कडेला एक लहानशी सुरुवात करून आज तो वर्षाला २५ लाख रुपये कमवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सत्यम सुंदरम तेलंगणा, केरळ, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमध्ये आपले प्रोडक्ट्स विकतो. त्याच्या बांबू उत्पादनांमध्ये टूथब्रश, पेन स्टँड, नेकपीस, कलाकृती, लॅम्पशेड्स, दांडिया स्टिक्स आणि टेम्परेचर डिस्प्ले फ्लास्क यांचा समावेश आहे. या निमित्ताने सत्यम सुंदरमच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

गोणीत पुस्तके घेऊन शाळेत जायचे

सत्यम सुंदरमची कथा संघर्ष आणि चिकाटीने भरलेली आहे. मुंगेर जिल्ह्यातील लखनपूर गावात जन्मलेल्या सत्यमचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. तो गोणीत पुस्तके घेऊन शाळेत जात असे. पुढे त्याच्या वडिलांची बदली झाली आणि संपूर्ण कुटुंब पूर्णियाला गेले. तेथे त्याला अप्पर केजीला प्रवेश मिळाला, कारण त्याचे प्राथमिक शिक्षण इतके काही चांगले नव्हते. तो अनेक विषयात नापास व्हायचा, त्यामुळे त्याला ‘फेलियर’ म्हटलं जायचं. त्याला एका कॉन्वेंट स्कूलमध्ये तो ‘जंगली’ आहे असं म्हणून काढून टाकलं होतं आणि याचं कारण फक्त एकच होतं की तो गावाकडचा होता. अखेरीस त्याने स्थानिक शाळेत शिक्षण घेतले आणि बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.

PCS परीक्षा पास करू शकला नाही

सत्यम उच्च शिक्षणासाठी कोलकाता येथे गेला. बीसीए पदवी मिळवली. बिहारमधील अनेक तरुणांप्रमाणे त्याच्यावरही सरकारी नोकरीचा दबाव होता. त्याचे वडील बिहार पोलिसात कार्यरत होते, त्यामुळे त्यांनाही मुलाकडून सरकारी नोकरीचीच अपेक्षा होती. या दबावाखाली त्याचे वजन एका महिन्यात १० किलोने कमी झाले. त्याने राज्य पीसीएसची परीक्षा दिली, पण थोड्या फरकाने तो अपयशी ठरला. दुसरा प्रयत्न करण्याऐवजी त्याने व्यवसाय प्रशासनात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… Success Story: ‘या’ IAS अधिकाऱ्याने केली होती नालेसफाई, आता पुन्हा आल्या आहेत चर्चेत, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास

एमबीए करताना आत्मविश्वास वाढला

२०२० मध्ये सत्यमने एमबीएला प्रवेश घेतला. आपण योग्य निर्णय घेतल्याचे प्रथमच त्याला वाटले. याआधी त्याने कधीही आवडीचा विषय निवडला नव्हता. MBA मध्ये तो वर्गात लक्ष देऊ लागला. प्रश्न विचारू लागला. चांगल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याची गणना होऊ लागली. एमबीएने त्याच्या कम्‍युनिकेशन, प्रेझेंटेशन आणि मार्केटिंग कौशल्यांना ओळखले. या काळात त्याने ब्रिटानिया आणि आयटीसी लिमिटेडसारख्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपही केली. त्याला ITC आणि बर्जर पेंट्सकडून प्री-प्लेसमेंट ऑफरदेखील मिळाल्या.

बांबू उद्योगाची माहिती गोळा केली

नोकरीची ऑफर स्वीकारण्याऐवजी सत्यमला त्याच्याच कंपनीत आपले कौशल्य वापरायचे होते. कॉलेजमध्ये असताना त्याला ईशान्येतील बांबू उद्योगाची माहिती मिळाली. बांबूपासून बनवलेल्या उत्पादनांवर त्याने संशोधन केले. सत्यमला नोकरी मिळू शकते हे त्याला माहीत होतं, पण त्याला व्यवसाय करायचा होता. बिहारमध्ये बांबू उत्पादन युनिट स्थापन करणारा पहिला माणूस होण्याची त्याची इच्छा होती. करोना महामारीच्या काळात पर्यावरणपूरक बांबू उत्पादनांची वाढती मागणीही त्याने नोंदवली. व्यवसाय सुरू करण्याची ही त्याच्यासाठी योग्य संधी होती.

…अन् अशी झाली लहान व्यवसायाची सुरुवात

सत्यमने व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्या लहान भावाकडून १५ हजार रुपये घेतले. रस्त्याच्या कडेला एक छोटासा टेबल ठेवला होता, त्यावर बांबूच्या १० बाटल्या ठेवल्या. हे प्रोडक्ट्स खरेदी करण्याची लोकांची इच्छा त्याला समजून घ्यायची होती. तसेच लोकांना प्लॅस्टिकऐवजी पर्यावरणपूरक उत्पादने घेण्यास प्रोत्साहित करायचे होते. प्लास्टिकचा वापर कमी करून बांबूपासून बनवलेली उत्पादने अंगीकारण्याचे पोस्टर घेऊन तो गर्दीत उभा असायचा. त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी लोक आपल्या गाड्या थांबवत असत.

हेही वाचा… वडिलांचा शिक्षणाला विरोध, पण मुलीने मानली नाही हार; वाचा मेहनतीने स्वप्न साकार करणाऱ्या कविताची गोष्ट

आता संपूर्ण देशभरात विकतो प्रोडक्ट्स

सत्यमला २०२२ च्या सुरुवातीला पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत आठ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. त्याची आई आशा अनुरागिनी यांच्यासोबत त्याने शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षेनंतर एक महिन्याच्या मध्यात आपली कंपनी सुरू केली. तो आता त्याचे प्रोडक्ट्स देशभर विकतो. या उत्पादनांची किंमत १० रुपयांपासून ४०,००० रुपयांपर्यंत आहे. प्लास्टिकला उत्कृष्ट पर्याय असल्याने, डिस्पोजेबल कटलरी, स्ट्रॉ, कप, प्लेट्स, टिकाऊ घरगुती वस्तू आणि फर्निचरच्या स्वरूपात बांबू मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात आहे. बांबूपासून बनवलेल्या दीडशेहून अधिक प्रकारच्या वस्तू तो विकतो.