Success Story of IITian Vinod Khosla: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं. पण, कधी कधी अपयशाचा प्रवास वाढला की माणूस खचतो आणि आपलं ध्येय विसरून जातो. अपयशाचा हा डोंगर अनेकदा जड वाटू लागतो, पण त्यातून मार्ग काढून जो कोणी हे ओझं कमी करू शकेल तोच जीवनात यशस्वी होतो. आज आपण अशाच एका हरहुन्नरी व्यक्तीच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याने दोन मोठ्या अपयशानंतर कोटींचं साम्राज्य उभारलं.

२८ जानेवारी १९५५ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे जन्मलेले विनोद खोसला एका उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. कुटुंबाचा व्यवसायाशी काहीही संबंध नसताना, खोसला यांनी स्वतःचा वेगळा मार्ग तयार करण्याचा निर्धार केला होता. जेव्हा विनोद यांना इंटेलच्या स्थापनेबद्दल आणि संस्थापकाबद्दल कळलं, तेव्हा त्यांना प्रेरणा मिळाली.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
article about battle between world champion ding liren and d gukesh
गुकेशच्या प्रयत्नांना यश मिळणार?

अपयशाचा धक्का

विनोद खोसला यांचा पहिला उद्योजकीय प्रयत्न सोया मिल्कचा उपक्रम होता, परंतु त्यांचा हा उपक्रम यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यांच्या करिअरचा हा पहिला धक्का त्यांना बसला. त्यांचा पुढील उपक्रम १९८१ मध्ये सह-स्थापित ‘डेटा डंप’ होता, परंतु तोदेखील अडखळला.

…अन् प्रयत्नांना मिळाले यश

एवढ्या मोठ्या अपयशानंतरदेखील विनोद खोसला यांनी हार मानली नाही. त्यांच्या नशिबाचे दार उघडले जेव्हा त्यांनी १९८२ मध्ये त्यांचे स्टॅनफोर्डचे वर्गमित्र स्कॉट मॅकनेली आणि अँडी बेचटोलशेम यांच्यासह ‘सन मायक्रोसिस्टम्स’ची (Sun Microsystems) सह-स्थापना केली. पहिले सीईओ म्हणून सन मायक्रोसिस्टम्सची झपाट्याने वाढ झाली. सन मायक्रोसिस्टम्सने शेवटी पाच वर्षांत वार्षिक विक्रीत रु. ८३८१ कोटींचे ध्येय साध्य केले.

खोसला यांचा भांडवल प्रवास क्लीनर पर्किन्सबरोबर सुरू झाला, जिथे त्यांनी ‘नेक्सजेन'( Nexgen) आणि ‘एक्साइट'(Excite) सारख्या यशस्वी गुंतवणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. आश्वासक तंत्रज्ञान ओळखण्याची त्यांची हातोटी स्पष्ट झाली होती, कारण त्यांनी ज्युनिपर नेटवर्क्स (Juniper Networks) आणि सेरेंट कॉर्पोरेशनला (Cerent Corporation) मदत केली आणि या दोन्हीतून त्यांना लक्षणीय परतावा मिळाला.

हेही वाचा… एका धाडसी निर्णयामुळे शून्यातून टेलर झाला अब्जाधीश; व्यवसायात उतरण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकानं वाचावी अशी गोष्ट

२००४ मध्ये खोसला यांनी नाविन्यपूर्ण, सामाजिकदृष्ट्या प्रभावी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खोसला व्हेंचर्स (Khosla Ventures) लाँच केले. त्यांची ही फर्म ‘clean energy’च्या गुंतवणुकीत त्यांचा पाया बनली, ज्याने इम्पॉसिबल फूड्स (Impossible Foods) आणि क्वांटमस्केप (QuantumScape) सारख्या उपक्रमांना समर्थन दिले.

विनोद खोसला यांची गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे, ज्यात अन्न वितरण आणि फिनटेक (fintech) यांचा समावेश आहे.

हेही वाचा… Truck Driver Turned YouTuber: कर्ज घेऊन एकेकाळी चालवायचे घर अन् आता महिन्याला कमावतात १० लाख, वाचा युट्यूबर ट्रक चालकाचा रंजक प्रवास

आज खोसला व्हेंचर्स सुमारे १,२५,७२६ कोटींचे व्यवस्थापन करते, जे खोसला यांच्या अपयशापासून ते जबरदस्त व्यवसाय साम्राज्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दर्शवते. त्यांची ५३ एकर इस्टेट, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे प्रतीक आहे, ज्याचे मूल्य $४० दशलक्ष आहे. ६२,०१७ कोटी रुपयांच्या नेटवर्थसह, खोसला हे जगातील सर्वात श्रीमंत आयआयटीयन्सपैकी एक आहेत, जे अपयशावर मात करून तुम्ही विलक्षण यश कसे मिळवू शकता याचे एक उत्तम उदाहरण आहे.

Story img Loader