Lucknow Student Shantanu Dwivedi : कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट २०२५ (CLAT 2025) परीक्षा १ डिसेंबर २०२४ रोजी संपली. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली होती, जी दुपारी २ वाजता सुरू झाली आणि ४ वाजता संपली. ही परीक्षा देशभरातील २४ राष्ट्रीय कायदा विद्यापीठांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. तर, सीएलएटीचा निकाल शनिवारी रात्री जाहीर झाला. परीक्षेला बसलेले उमेदवार आता consortiumofnlus.ac.in या अधिकृत CLAT वेबसाइटवर त्यांचे स्कोअर कार्ड तपासू शकतात. तर आज आपण सीएलएटी २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातून अव्वल आलेल्या विद्यार्थ्याबद्दल जाणून घेणार आहोत. कसा होता त्याचा प्रवास, कशी केली तयारी थोडक्यात ते जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर लखनऊ येथील शंतनू द्विवेदी या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट २०२५ (CLAT 2025) च्या टॉपर्समध्ये त्याने आपले नाव कोरले आहे. त्याने जनरल कॅटेगरीत, ऑल इंडिया रँक (AIR) ८ मिळवली आहे. तसेच तो संपूर्ण उत्तर प्रदेशातून (यूपीमध्ये) अव्वल आला आहे.

हेही वाचा…Success Story Of Anudeep Durishetty : गूगलची सोडली नोकरी, UPSC परीक्षेत तीन वेळा आलं अपयश; वाचा, देशात पहिला आलेल्या अनुदीप दुरीशेट्टीची गोष्ट

शंतनू द्विवेदी चालू शैक्षणिक सत्रात सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS), अलीगंज कॅम्पस १ मधून इयत्ता १२ ची बोर्ड परीक्षा देणार आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, शंतनूने सीएलएटी २०२५( CLAT 2025 ) मध्ये मिळविलेल्या रँकबद्दल उत्सुकता व्यक्त केली. त्यांनी नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळुरूमध्ये प्रवेश घेण्याच्या त्यांचा इच्छेबद्दलही सांगितले. शंतनूने सीएलएटी २०२५ ( CLAT 2025) मध्ये ९९.९८७ पर्सेंटाइल मिळवले म्हणजे ११६ पैकी १००.५ गुण मिळवले. त्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर एकूण १२० गुणांमधून चार चुकीचे प्रश्न काढून टाकण्यात आले.

कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) २०२५ च्या तयारीबद्दल चर्चा करताना, शंतनूने उघड केले की, तो त्याच्या इयत्ता ११ वीच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना गेल्या वर्षी त्याने सीएलएटी २०२५ च्या परीक्षेसाठी कोचिंग घेण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील कायदेशीर अभ्यासाचे (लीगल स्टडीज) शिक्षक श्वेतांक शर्मा यांना दिले. परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी मार्गदर्शन आणि पाठिंबा देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे त्याने सांगितले.