Success Story of Shashank Kumar : शेतकऱ्यांसाठी शेती हा अगदीच जिव्हाळ्याचा विषय, असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी शेतकरी शेती करून, त्यातून पिकवलेल्या अन्नधान्यापैकी काही भागाची आपलं आणि आपल्या कुटुंबाचं प्रथम पोट भरावं या दृष्टीनं तजवीज करायचे आणि मग उरलेल्या उत्पादनाची विक्री करायचे. पण, आजकालच्या बहुतांशी मुलांना शेती करण्याची आवडच नाही. त्यांच्यापैकी काहींचा अनेक वस्तू विकून व्यवसाय करू; पण शेती करणार नाही, असा हट्ट असतो. पण, आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल (Success Story) जाणून घेणार आहोत; ज्यांनी IITian ची लाखोंची नोकरी सोडली, शेतकऱ्यांसाठी काम केलं आणि १२५० कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशांक कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. ते मूळचे छपरा-बिहारचे रहिवासी आहेत. शशांक यांची आई शिक्षिका होती; तर वडील बिहार राष्ट्रीय विद्युत मंडळात काम करीत होते. शशांक कुमारने झारखंडमधील नेतरहाट निवासी शाळेतून शिक्षण घेतलं. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून टेक्स्टाईल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यांनी आयआयटी दिल्लीच्या मॅनेजमेंट स्टडीज विभागात बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर शशांक कुमार यांनी बीकन ॲडव्हायजरी सर्व्हिसेस या व्यवस्थापन सल्लागार कंपनीसाठी २.५ वर्षं काम केलं.

IIT खरगपूरमधील शशांक कुमार यांचे जुने मित्र मनीष कुमार यांच्याबरोबर त्यांनी ही नोकरीसुद्धा सोडली आणि शेती उद्योगात सुधारणा करण्याच्या उद्देशानं २०११ मध्ये ‘नॉन-प्रॉफिट फाऊंडेशन फर्म आणि फार्मर्स’ची स्थापना केली. शशांक कुमार यांनी २०१२ मध्ये DeHaat सोशल एंटरप्राइझ ग्रीन ॲग्रिव्होल्युशन सुरू करून शेतकऱ्यांना भेट दिली. तेव्हा शेतकऱ्यांना असं वाटलं की, २४ वर्षांच्या मुलाकडे शेतीबद्दल काय माहिती असणार?

हेही वाचा…Journey: श्वानाबरोबर देशप्रवास करणाऱ्या यती गौरला भेटा! १३०० किमी पायी चालून अनेक राज्यांमध्ये फिरला; वाचा ‘त्याचा’ प्रेरणादायी प्रवास…

शशांक कुमारचा प्रेरणादायी प्रवास (Success Story of Shashank Kumar) :

पण, आयआयएम व एनआयटीचे माजी विद्यार्थी मनीष कुमार यांनी व्यवसाय सोडल्यापासून अमरेंद्र सिंग, श्याम सुंदर, आदर्श श्रीवास्तव व शशांक कुमार हे सध्या कंपनी सांभाळतात. गुरुग्राम आणि पाटणा येथे कार्यालये असलेल्या DeHaat या व्यवसायाचा शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढविण्यात मदत करण्यासाठी कल्पना, योजना देणे असे त्यांचे काम आहे.

DeHaat म्हणजे काय?

पाटणा-आधारित DeHaat हे एक डिजिटल पोर्टल आहे; जे लहान-मोठ्या शेतकऱ्यांना विविध शेतीसंबंधित उपकरणे पुरविणाऱ्या लहान-व्यवसाय मालकांशी जोडते. हे पुरवठादार बियाणे, खते, अगदी यंत्रसामग्री आदी गोष्टींची खरेदी करतात; तसेच पीक सल्ला सेवा आणि बाजार कनेक्शन याबद्दल माहिती देतात.

सीईओ शशांक कुमार (Shashank Kumar) यांच्या म्हणण्यानुसार, शेतक-यांना कृषी सुधारित विक्री आणि देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कृषी उत्पादनांच्या व्यापारामुळे या आर्थिक वर्षात ॲग्रीटेक कंपनी DeHaat चे उत्पन्न ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाढून दोन हजार ३०० कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे. सीईओ शशांक कुमार यांच्या म्हणण्यानुसार आणि PTI नुसार, २०२२ मध्ये DeHaat ची कमाई सुमारे १,२५० कोटी रुपये होती.

तर अशी आहे शशांक कुमारचा यांचा प्रेरणादायी प्रवास…

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of shashank kumar man who iitian who left high paying job to build 1250 rupees crore revenue business called dehaat asp