Success Story Of Shashvat Nakrani Marathi News : भारतातील सर्वांत मोठी मर्चंट पेमेंट कंपनी भारतपे (BharatPe)चे सह-संस्थापक शाश्वत नाक्राणी (Shashvat Nakrani) भारतातील सर्वांत तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीशांपैकी एक आहेत. २०२१ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी, आयआयएफएल (IIFL) वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळविणारी ही सर्वांत तरुण व्यक्ती ठरली आहे. तर कसा होता शाश्वत नाक्राणी यांचा प्रवास हे आपण थोडक्यात जाणून घेऊ (Success Story Of Shashvat Nakrani)…

गुजरातमधील भावनगर येथे जन्मलेला शाश्वत नाक्राणी आता २६ वर्षांचा आहे. त्याने २६ वर्षांच्या आतमध्येच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०१५ ते २०१९ या कालावधीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली येथे टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण असताना त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी भारतातील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांपैकी एक ‘भारतपे’ची सह-स्थापना केली.

Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
Success Story Of Ashok Khemka
Success Story Of Ashok Khemka : ३३ वर्षांच्या कारकिर्दीत ५७ वेळा बदली! वाचा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याची कहाणी
Nana Patekar
नाना पाटेकरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिल्या मित्रांच्या लग्नपत्रिका; ‘या’ विषयांमध्ये घेतलेलं प्रशिक्षण, अनुभव सांगत म्हणाले…
Success Story Of Gaurav Teotia
Success Story Of Gaurav Teotia : IIT-IIM मधून घेतलं शिक्षण, लॉंड्री सुरू करून उभारला कोटींचा उद्योग; वाचा गौरवची प्रेरणादायी गोष्ट
sant dnyaneshwar rathotsav in alandi
आळंदीत माउलींचा रथोत्सव; वारकरी भक्तिरसात चिंब
Essar Group co-founder Shashi Ruia passes away
एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन

डिजिटल पेमेंट क्षेत्रात समस्या निर्माण होत असताना ‘भारतपे’ची कल्पना त्यांना सुचली. पेटीएम, गूगल पे, फोनपे व बीएचआयएम यांसारख्या अनेक ॲप्सवरून व्यवहार व्यवस्थापित करण्यात व्यापाऱ्यांना अडचणी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावर उपाय म्हणून त्यांना युनिफाईड पेमेंट गेटवे तयार करण्याची कल्पना सुचली. ‘भारतपे’चा उपाय झिरो एमडीआर (zero MDR) व्यापारी सवलत दर (Merchant Discount Rate) यूपीआय क्यूआर कोड होता, ज्याने व्यापाऱ्यांना एक क्यूआर कोड वापरून सर्व प्रमुख यूपीआय ॲप्सवरून पेमेंट स्वीकारण्याची परवानगी दिली. या तरुणाने भारतात डिजिटल पेमेंट करण्याची पद्धत बदलली आणि ‘भारतपे’ला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे बनवले.

हेही वाचा…Success Story Of Ashok Khemka : ३३ वर्षांच्या कारकिर्दीत ५७ वेळा बदली! वाचा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याची कहाणी

अशा प्रकारे ‘भारतपे’ ॲप अस्तित्वात आले (Success Story Of Shashvat Nakrani)

शाश्वत नाक्राणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT दिल्ली)मधून टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर पदवी घेत होता. तेव्हा त्यांनी पाहिले की, यूपीआयचा मोठ्या प्रमाणावर व्यवहारांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून पेमेंट व्यवस्थापित करण्याचा कोणताही सोपा मार्ग नव्हता. त्यावर एक सोपा उपाय म्हणून त्याने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI)च्या इंटरऑपरेबिलिटी वैशिष्ट्याचा वापर केला. अशा प्रकारे ‘भारतपे’ ॲप अस्तित्वात आले.

२०२४ पर्यंत शाश्वत नाक्राणी यांच्या एकूण संपत्तीने तब्बल १,३०० कोटी रुपयांपर्यंत मजल गाठली आहे. त्यामुळे त्यांना भारतातील सर्वांत तरुण अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे. फायनान्शियल इयर २०२२ मध्ये त्यांना २९.८ लाख रुपये पगार होता. स्टॉकवर आधारित पेमेंट्समध्ये अतिरिक्त ७० कोटी रुपये आणखीन जोडले गेले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत २१८ टक्क्यांची वाढ दर्शवते आहे.

शाश्वत नाक्राणी यांची यशोगाथा ही नवनिर्मिती आणि उद्योजकतेच्या सामर्थ्याचा खरा पुरावा आहे. भारताच्या फिनटेक लॅण्डस्केपला आकार देण्यामधील त्यांची भूमिका इतरांना विशेषतः तरुण पिढीला धाडसी जोखीम पत्करून, त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देत आहे. आज शाश्वत नाक्राणी यांचा प्रवास भारतभरातील तरुण उद्योजकांना प्रेरणा देत आहे (Success Story Of Shashvat Nakrani).

Story img Loader