Success Story Of Tathagat Avatar Tulsi In Marathi : देशात असे असंख्य विद्यार्थी आहेत; ज्यांनी आपल्या कलागुण, आवडीने लहान वयातच महत्त्वाचे टप्पे गाठले आणि सर्वांनाच थक्क करून सोडले. कारण- काही काही विद्यार्थी करिअरच्या बाबतीत प्रचंड हुशार असतात. तर आज आपण अशाच एक व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने अगदी कमी वयात त्याच्या करिअरमधील अनेक टप्पे गाठले खरे; पण आजही ते बेरोजगार आहेत.
बिहारमधील तथागत अवतार तुलसी (Success Story Of Tathagat Avatar Tulsi) हे त्यापैकी एक आहेत; पण सध्या मात्र ते बेरोजगार आहेत. लहानपणापासून भौतिकशास्त्राचा सराव करणारे तथागत आजकाल कायद्याच्या पुस्तकात रमले आहेत. कारण- त्यांना भौतिकशास्त्राबरोबरच आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करायचा आहे. एकेकाळी ‘बाल प्रॉडिजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुलसीचा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९८७ रोजी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात झाला.
तुलसी यांनी वयाच्या नवव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी पाटणा सायन्स कॉलेजमधून बीएस्सी पदवी मिळवून इतिहास रचला. १२ व्या वर्षी त्यांनी त्याच कॉलेजमधून एमएस्सी पूर्ण केले. तुलसीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी), बंगळुरू येथे ते पीएच.डी. करण्यासाठी पुढे गेले.
वयाच्या २२ व्या वर्षी असिस्टंट प्रोफेसर (Success Story Of Tathagat Avatar Tulsi ) :
वयाच्या २२ व्या वर्षी तुलसी यांना आयआयटी-मुंबई कॅम्पसमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीची ऑफर देण्यात आली. २०१० मध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये सहायक प्राध्यापक पदावर ते रुजूही झाले होते. पण, त्यांना प्रचंड ताप आल्यामुळे ते दीर्घ काळ रजेवर होते. त्यानंतर त्यांना आरोग्याच्या कोणत्या ना कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागले. पण जेव्हा या समस्या वाढू लागला तेव्हा त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून चार वर्षांची रजा घेऊन २०१३ मध्ये मुंबई सोडली. तेव्हापासून ते पाटण्यात राहत आहेत आणि तेव्हापासून तुलसी बेरोजगार आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वांत कमी वयात दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल तथागत अवतार तुलसी यांचे नावसुद्धा नोंदवण्यात आले आहे. आता अखेर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन स्वत:साठी नवीन मार्ग तयार करण्याचा विचार केला आहे.