Success Story of Trishneet arora: अखंड मेहनत आणि जिद्दीने सगळं काही साध्य करता येतं असं म्हणतात. मग कोणतंही अपयश आलं तरी ते आपल्या स्वप्नांना पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाही. अपयश आलं म्हणून हार मानून न जाता पुन्हा हिमतीने उभं राहून तो प्रवास करावा लागतो तेव्हाच यश हाती लागतं. आज आपण अशाच एका हरहुन्नरी तरुणाची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत, ज्याने बारावीमध्ये नापास होऊनसुद्धा अब्जावधीचा बिझनेस सुरू केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिश्नित अरोरा याची कथा प्रेरणादायी आहे. चंदीगडमध्ये जन्मलेल्या त्रिश्नितला अभ्यासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तो आठवी आणि बारावीमध्ये नापास झाला आणि यामुळे त्याला शाळा सोडावी लागली. पण, डिजिटल जग आणि सायबर सिक्युरिटीबद्दल त्याची तळमळ कायम होती. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्याने TAC सिक्युरिटी सुरू केली, जी आज सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. पदवीपेक्षा कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वाचे आहे हे त्रिश्नितने सिद्ध केले.

हेही वाचा… जेईईमध्ये केलं टॉप अन् नंतर केलं बी. टेक, IIT बॉम्बेचा ‘हा’ विद्यार्थी आता अमेरिकेत करतोय भरघोस पगाराची नोकरी

TAC Security ची सुरुवात आणि प्रवास

TAC सिक्युरिटी ही ११०० कोटी रुपयांची कंपनी आहे, ज्याचा पाया त्रिश्नितने घातला होता. ही कंपनी भारत, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासह १५ देशांमध्ये सायबर सुरक्षा सेवा पुरवते. त्याच्या मोठ्या ग्राहकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, अमूल, बीएसई आणि सीबीआय यांचा समावेश आहे. त्याची कंपनी व्हल्नरेबिलिटी मॅनेजमेंटमध्ये माहीर आहे आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात मोठ्या ब्रँडसाठी विश्वासू भागीदार आहे.

सरकारी सल्लागार म्हणून भूमिका

त्रिश्नितने केवळ कॉर्पोरेट क्षेत्रातच नव्हे तर सरकारी पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे. त्रिश्नित पंजाब आणि गुजरात सरकारचे आयटी सल्लागार राहिला आहे. या राज्यांमध्ये सायबर सुरक्षा मजबूत करण्यात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या कठोर परिश्रम आणि कौशल्यामुळे तो भारतातील सर्वात तरुण आणि सर्वात प्रभावशाली सायबर सुरक्षातज्ज्ञ बनला आहे.

हेही वाचा… शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास

त्रिश्नित अरोराचा प्रेरणादायी प्रवास

आज ३० वर्षांचा त्रिश्नित लाखो तरुणांसाठी आदर्श बनला आहे. कठोर परिश्रम आणि जिद्द या दोन्ही गोष्टी असतील तर अपयश कधीच हाती लागत नाही. त्रिश्नितने शाळा सोडल्यापासून ते अब्जाधीश होण्याचा हा खडतर प्रवास जिद्दीने केला आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात त्याने भारताचे नाव उंचावले. यशाच्या मार्गातील आव्हानांना अडथळे मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of trishneet arora founder of tac security once failed in 12th now reliance and bsc are his clients dvr