Success Story Of Ujjwal Kumar In Marathi : बिहार लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल (BPSC’s 69th CCE final results) २६ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालाची हजारो लोकांनी आतुरतेने वाट पाहिली होती. हा निकाल आता अधिकृत बिहार लोकसेवा आयोग (BPSC) वेबसाइटवर bpsc.bih.nic.in वर उपलब्ध आहे. या परीक्षेत उज्ज्वल कुमार उपकार (Ujjwal Kumar Upkar) अव्वल ठरला आहे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील या विद्यार्थ्यांच्या यशामागील सत्य काय आहे ते जाणून घेऊ (Success Story Of Ujjwal Kumar) …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उज्ज्वल कुमार सीतामढी जिल्ह्यातील रायपूर गावचा रहिवासी आहे. उज्ज्वल कुमारचे बाबा सुबोध कुमार गावात कोचिंग सेंटर चालवतात आणि त्याची आई अंगणवाडी सेविका आहे. सीतामढी जिल्ह्यातील रायपूर या छोट्याशा गावात वाढलेल्या उज्ज्वलने त्याच्या आजूबाजूला मर्यादित संसाधने असूनही शिक्षणाला नेहमीच महत्त्व दिले. एनआयटी उत्तराखंड येथे मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेण्यासाठी त्याने बरियारपूर येथील किसान कॉलेजमधून १२ वी पूर्ण केली.

हेही वाचा…Success Story Of Manu Agrawal: एकेकाळी ३५ कंपन्यांनी दिला नकार; पण तरीही जिद्दीने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वाचा, मनू अग्रवालचा प्रवास

६९ व्या BPSC परीक्षेत पटकवला अव्वल क्रमांक (Success Story Of Ujjwal Kumar) :

उज्ज्वल याने अभियांत्रिकी शिक्षण घेतले असले तरीही प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने बीपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात तो ६७ व्या BPSC परीक्षेत ४९६ वा क्रमांक मिळविला. पण, उज्ज्वलने इथेच हार मानली नाही. त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याने ६९ व्या BPSC परीक्षेत अव्वल क्रमांक पटकवला. आता उज्ज्वल हाजीपूरमध्ये ब्लॉक कल्याण अधिकारी (BWO) म्हणून काम करत आहे.

सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत पूर्णवेळ नोकरी आणि त्यानंतर रात्री १० ते २ पर्यंत तो अभ्यास करून परीक्षेची तयार करत असायचा. या शिस्त आणि फोकसमुळे त्याला बीपीएससी परीक्षेत अव्वल येण्याचे स्वप्न पूर्ण करता आले. आज त्याची कथा (Success Story Of Ujjwal Kumar) अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात केलीत तरीही योग्य मानसिकता व समर्पणाने, कोणत्याही आव्हानावर मात करणे आणि यश संपादन करणे शक्य असते हे त्याने दाखवून दिले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of ujjwal kumar upkar who got first rank in bpsc 69th cce final results asp