Success Story Of Uthaya Kumar : उच्चशिक्षित होऊन चांगल्या पगाराची नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण, काही तरुण मंडळी अशी असतात; जी उच्च शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी न करता, व्यवसाय करून आपलं यशस्वी करिअर (Success Story) घडवतात. तर आज आपण अशाच एक व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचे ठरवले.

उथया कुमार (Uthaya Kumar) असे त्यांचे नाव आहे. कन्नियाकुमारी, तमिळनाडू येथे जन्मलेल्या उथया कुमार यांच्या कारकिर्दीची सुरुवात (Success Story) वैज्ञानिक जगात झाली. पण, काही काळानंतर त्यांनी उद्योगाच्या जगात एक धाडसी झेप घेतली. तसेच हे सिद्ध केले की, नवीन मार्गावर जाण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो.

sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Ameesha Patel
“यांच्यानंतर बॉलीवूडचं काय होणार…”, अमीषा पटेलने ‘शेवटचे सुपरस्टार’ म्हणत घेतली ‘या’ अभिनेत्यांची नावं
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?
Success Story Of Satvat Jagwani In Marathi
Success Story : दोन वर्षात सोडली आयआयटी, उघडलं स्वतःच युट्युब चॅनेल; वाचा टॉपर सत्वत जगवानीची गोष्ट
actor suvrat joshi play role in vicky kaushal chhaava movie
‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता ‘छावा’मध्ये झळकणार! विकी कौशलबद्दल म्हणाला, “सेटवर प्रचंड मेहनत…”

तर एम.फिल आणि पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर, उथया यांनी भारतातील प्रतिष्ठित अंतराळ संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) येथे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. इस्रोमध्ये, उपग्रह प्रक्षेपणात वापरल्या जाणाऱ्या द्रव इंधनाच्या घनतेची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यांच्या कौशल्यामुळे उपग्रहांचे सुरक्षित, यशस्वी प्रक्षेपण होईल याची हमी मिळाली, जो इस्रोच्या अंतराळ मोहिमांचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नंतर त्यांनी सहायक प्राध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला आणि आपले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. पण, विज्ञान शिक्षणातील कारकीर्द एवढी प्रभावी असूनही, उथया यांना उद्योगाच्या जगात जाण्याची ओढ लागली होती.

हेही वाचा…Success Story : एका जिद्दीची गोष्ट! शाळेतील शिक्षक ते आयआरएस अधिकारी; वाचा विष्णू औटी यांची प्रेरणादायी कहाणी

उद्योगजगतात जाण्याच्या ओढीमुळे २०१७ मध्ये मित्रांच्या पाठिंब्याने, उथया यांनी स्वतःचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मग त्यांनी आई-वडील सुकुमारन आणि थुलसी यांच्या आदरार्थ त्यांच्या नावांतील आद्याक्षरांनी S T Cabs या नावाची टॅक्सी सेवा सुरू केली. सुरुवातीला S T Cabs हा एक छोटा असलेला व्यवसाय होता; पण आता या व्यवसायाने झेप घेतली असून, त्यांच्या ताफ्यात ३७ गाड्या आहेत. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न अंदाजे दोन कोटी रुपये आहे. परंतु, S T Cabs च्या यशाचे मोजमाप त्यांनी फक्त आर्थिक नव्हे, तर व्यवसायाची स्थापना fairness (न्याय) आणि inclusivity (समावेश) यानुसार केले आहे.

७०-३० अशी रेव्हन्यू-शेअरिंग व्यवस्था :

अनेक व्यवसायांच्या विपरीत, S T Cabs चे काम भागीदारी मॉडेलवर केले जाते, जेथे चालकांना कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मानले जाते. एस टी कॅब्समधील चालकांना ७०-३० अशी रेव्हन्यू-शेअरिंग व्यवस्था आहे. त्यामध्ये चालकांना ७० टक्के कमाई मिळते आणि ३० टक्के कंपनीकडे जाते; ज्यामुळे कंपनीच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. उथया यांचा व्यवसाय फायद्याच्या पलीकडे आहे, ते कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देतात. त्यांनी स्थलांतरित चालकांसाठी घरे उपलब्ध करता यावीत आणि त्यांच्या गावी मुलांसाठी शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देता यावा यासाठी निधीसुद्धा आधीपासूनच बाजूला करून ठेवला आहे.

कोविड-१९ महामारीने व्यवसायासमोर एक मोठे आव्हान निर्माण केले; पण उथया यांची इच्छाशक्ती कधीच कमी झाली नाही. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय चालू ठेवण्यासाठी स्वतः पूर्ण सुरक्षात्मक उपकरण घालून त्यांनी लांबच्या ड्राइव्ह्स घेतल्या, ज्यामुळे व्यवसाय चालू राहिला. यातून त्यांची मानसिकता, समर्पण दिसले. आज उथया कुमार यांची कहाणी (Success Story) ही सामाजिक जबाबदारीच्या खोल जाणिवेला व्यावसायिक कौशल्याची जोड देऊन, स्वतःला कसे नवीन बनवू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

Story img Loader