Success Story Of IPS Vaibhav Krishna : योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने वैभव कृष्णा यांची महाकुंभमेळ्याचे डीआयजी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीसाठी त्यांना आझमढ येथून बदली करण्यात आली आहे. वैभव कृष्णासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांची नुकतीच बदली करण्यात आली. त्यांच्याकडे आता महाकुंभमेळ्याच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली असून, तातडीने भूमिका घेण्यास सांगितले आहे. कसा होता वैभव कृष्णा यांचा प्रवास (Success Story) थोडक्यात जाणून घेऊया…
वैभव कृष्णा हे मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्याचप्रमाणे ते २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कृष्णा यांनी आयआयटी रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केल्यानंतर, ते नागरी सेवा परीक्षेला बसले आणि २००९ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून देशभरात ८६ वा क्रमांक मिळवला आणि आयपीएस अधिकारी झाले. त्यांनी आझमगढमधील भूमिकेपूर्वी, नोएडामध्ये एसएसपी (वरिष्ठ पोलिस अधीक्षक) म्हणून काम केले होते (Success Story), पण हे स्थान थोडे वादग्रस्त होते.
बेकायदा खाणकामांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस (Success Story)
नोएडामधील त्यांच्या कार्यकाळात कृष्णा यांनी बेकायदा खाणकामांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्यांनी अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे पत्र सरकारला लिहिले. त्याचवेळी त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला, जेव्हा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये ते एका महिलेबरोबर तडजोड करत असल्याचे दाखवण्यात आले. या घटनेनंतर त्यांना निलंबित करण्यात आले. पण, कृष्णा यांनी हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा केला आणि त्याबाबत एफआयआरहीदाखल केला.
१४ महिन्यांच्या निलंबनानंतर (९ जानेवारी २०१९पासून), वैभव कृष्णा यांना ५ मार्च २०२१ रोजी पुन्हा लखनऊमध्ये पोलिस प्रशिक्षण आणि सुरक्षा अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. निलंबनाच्या वेळी ते नोएडाचे एसएसपी होते. त्यांच्या निलंबनानंतर नोएडातील एसएसपीचे पद रद्द करण्यात आले. कारण १४ जानेवारी २०२० रोजी गौतम बुद्ध नगरला राज्याचे पहिले पोलिस आयुक्त म्हणून घोषित करण्यात आले. अशा प्रकारे, वैभव कृष्णा नोएडाचे शेवटचे एसएसपी बनले.