Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे म्हणतात. अनेक वेळा पराभव पत्करूनही जे न खचता जिंकेपर्यंत अथक परिश्रम करीत वाटचाल करीत राहतात तेच खरे चॅम्पियन असतात. अशीच यशोगाथा आहे हरियाणातील विजय वर्धन यांची. विजय वर्धन यांनी अनेकदा सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली; पण ते कधीच उत्तीर्ण झाले नाहीत. पण, अखेर ते जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वांत कठीण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. अपयशाची अनेक कडू फळे खाल्ली असली तरी आपणही यशाचे सर्वांगसुंदर गोड फळ मिळवून, प्रत्यही ते खाऊ शकतो हे त्यांनी याद्वारे दाखवून दिले. त्यामुळे त्यांनी स्वतःवरील विश्वास दृढ झाला. आज विजय वर्धन हे आयएएस अधिकारी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३५ वेळा अपयश आलं :

आयएएस अधिकारी विजय वर्धन यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला. त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ते दिल्लीला गेले. विजय एक-दोन नव्हे, तर जवळजवळ ३५ वेळा वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी परीक्षेला बसले; पण एकही परीक्षा पास होऊ शकले नव्हते. पण, अखेर २०१८ मध्ये त्यांनी जगातील सगळ्यात मोठी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि १०४ वा क्रमांक पटकवला .

हेही वाचा…SSC MTS 2024: एसएससी एमटीएस परीक्षेअंतर्गत कोणत्या पदावर मिळणार नोकरी? कधी होणार परीक्षा, कशी होणार उमेदवाराची निवड; जाणून घ्या…

दोन वेळा दिली यूपीएससीची परीक्षा :

२०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत विजय वर्धन यांनी १०४ वा क्रमांक पटकावल्यामुळे त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. पण, त्यांचे स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचे असल्याने ते समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ७० वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न यशस्वीरीत्या पूर्ण केले. विजय वर्धन यांनी २०१८ आणि २०२१ अशी दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

अपयश स्वीकारून, त्यापासून पुढे जाण्यावर भर दिला आणि निष्ठा व प्रामाणिकपणे काम करीत निकराने परिस्थितीशी लढत राहिले, तर यश नक्कीच मिळू शकते. याबाबतचे उत्तम उदाहरण आज आपल्याला विजय वर्धन यांच्या रूपानं पाहायला मिळालं आहे. जिथे काही व्यक्ती एक-दोन परीक्षांमध्ये नापास झाल्यावर निराश होतात, तिथे विजय वर्धन यांची चिकाटी हे दाखवून देते की, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. वारंवार अपयशी होण्यापासून ते स्वप्न साकार करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of vijay wardhan who failed 35 times and then cracked civil services exam twice to become ias officer asp