Success Story: उत्तर प्रदेशातील एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाने जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने अनेक अडचणींना झुगारून आपले कुटुंब, गाव आणि जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. या विद्यार्थ्याचे नाव राजन भट्ट असून तो महाराजगंज जिल्ह्यातील सिसवा भागातील विशोखोर गावातील रहिवासी आहे. तो त्याच्या संघर्षाच्या प्रेरणादायी प्रवासाने अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

राजन लहानपणापासून हुशार

राजन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने स्थानिक शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेला. परंतु, त्याच्या यशाचा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि त्यांचे उत्पन्नही कमी होते, तरीही त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणात त्यांची संपत्ती गुंतवण्याचा धाडसी निर्णय घेतला.

वडिलांनी दिली साथ

आपल्या मुलाची अभियंता होण्याची इच्छा ओळखून, राजनच्या वडिलांनी कोटा येथे त्याच्या शिक्षणासाठी त्यांची शेती विकली. मर्यादित संसाधने असूनही कुटुंबाने त्यांच्या मुलाला सर्वोत्तम संधी मिळावी यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. भरपूर कष्ट करून मुलाला शिक्षण दिले आणि मुलानेही वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन अभ्यास केला.

एका मुलाखतीमध्ये राजनचे वडील म्हणाले की, “आम्ही स्वतः उच्चशिक्षित नसलो तरी आमच्या मुलाची प्रगती पाहण्याची आम्हाला खूप इच्छा होती. आम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी आमच्या परीने सर्वकाही केले.”

“जर एखाद्याच्या मनात खऱ्या आकांक्षा असतील आणि प्रामाणिक परिश्रम केले तर काहीही अशक्य नाही,” असे राजन भट्ट एका मुलाखतीत म्हणाला.

Story img Loader