Success Story: एकेकाळी २,५०० रुपयांच्या भांडवलावर लाडू विकणारे प्रमोद कुमार आज मेहनतीच्या जोरावर करोडोंचे मालक झाले आहेत. मेहनत आणि नशिबाच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळवले आहे. ते मूळचे बिहारचे रहिवासी असून, आता त्यांचा हा व्यवसाय बिहार व झारखंडसह अनेक राज्यांत पसरला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींहून अधिक आहे. त्यांनी हे यश कसे मिळवले ते आपण जाणून घेऊ…

प्रमोद कुमार भदानी हे एका सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झाले असून, त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे वडील एक किरकोळ मिठाई विक्रेता होते. हातगाडीवर लाडू विकून, ते उदरनिर्वाह करायचे. प्रमोद यांनी वयाच्या १४ व्या वर्षी शिक्षण सोडले आणि वडिलांना मदत करायचे ठरवले. भावाला हाताशी घेऊन, त्यांनी वडिलांकडून २,५०० रुपये उसने घेतले आणि त्यानंतर आपल्या शहरात लाडू विकायला सुरुवात केली. त्यांचे स्वादिष्ट लाडू लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाले आणि इथेच त्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली.

प्रमोद यांचे मोठा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. ते रात्रभर लाडू बनवायचे आणि दिवसा विकायचे. आपला छोटा व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. प्रमोद यांना पहिले मोठे यश मिळाले जेव्हा त्यांनी स्वतःचे मिठाईचे छोटे दुकान उघडले. त्यानंतर त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी बिहारच्या इतर भागांत आणि नंतर झारखंड आणिव शेजारच्या राज्यांमध्ये लाडू पुरवायला सुरुवात केली. हळूहळू प्रमोद यांच्या लाडूनिर्मितीची छोटी जागा कमी पडू लागली आणि मग त्यांना मोठ्या कारखान्याची उभारणी करावी लागली. आज तेथे पारंपरिक पद्धतीने आणि पूर्ण स्वच्छता राखून लाडू बनवले जातात.

हेही वाचा: Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला

प्रमोद लड्डू भंडार यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा व कोलकत्ता येथे त्यांची एकूण आठ आउटलेट्स आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपये आहे. लाडूव्यतिरिक्त प्रमोद लड्डू भंडार इतर मिठाई, नमकीन आणि बेकरी उत्पादनांचीही विक्री करते. एकेकाळी रस्त्यावर लाडू विकणारे प्रमोद कुमार भदानी यांचे नाव आज करोडपती उद्योजक म्हणून घेतले जाते.

Story img Loader