Success Story: पंकज नेगी पौरी गढवाल जिल्ह्यातील उरेगी गावचे रहिवासी आहेत. पंकज नेगी यांनी दिल्लीतील एका नामांकित कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या मूळ जिल्ह्यात पौरी येथे स्थानिक उत्पादने आणि मसाल्यांचा कारखाना सुरू केला. या कारखान्यामुळे त्यांच्यासह गावातील इतर लोकांनाही ते रोजगार देत आहेत.
पंकज नेगी हे १२ वर्षे दिल्लीत काम करत होते, पण त्यानंतर ते नोकरी सोडून गावी गेले. गावी परतल्यावर पंकज यांनी गावातच मसाल्यांचा कारखाना सुरू केला आणि गावकऱ्यांकडून स्थानिक उत्पादने आणि जाख्या, मांडवा, झांगोरा, हळद, मिरची, धणे, मेथी यांसारखे मसाले विकत घेऊन त्यांची चांगली पॅकिंग करून ते ‘एव्हर टेस्ट’ या नावाने विकतात.
पंकज नेगी यांनी केली स्वतःच्या गावात उद्योगाची स्थापना
गावी घरी परतल्यानंतर त्यांनी गावोगावी मसाले आणि डोंगरी उत्पादने गोळा करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी एक छोटा कारखाना सुरू केला, जिथे ते मसाले बनवायचे आणि पॅक करायचे आणि ‘एव्हर टेस्ट’ नावाने बाजारात विकायचे.
एका मुलाखतीत पंकज यांनी सांगितले की, त्यांनी हे मसाले हळूहळू बाजारात विकायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मसाल्याची चव आणि दर्जा लोकांना आवडू लागला. पुढे जसजसे काम वाढत गेले, तसतसे कामावर ते इतर लोकांना ठेवू लागले.
गावात रोजगाराची संधी उपलब्ध
पंकज यांनी काही पुरुषांना कामावर ठेवले असून ते काही महिला विक्रेत्यांसह जोडले गेले आहेत. त्यांनी सांगितले की, ते एका महिन्यात तीन लाख रुपयांपर्यंतचा व्यवसाय करतात, ज्यामध्ये ते ८० हजार रुपये वाचवतात. त्यांना व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण झाली असून बाजारात मिळणारे बहुतांश मसाले भेसळयुक्त असतात. पण, पंकज यांच्या मसाल्यांमध्ये कुठलीही भेसळ वापरली जात नाही, त्यांच्या मसाल्यांना बाजारात मागणी आहे.