IAS Manuj Jindal: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, ज्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते. पण, आज आम्ही तुम्हाला अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी अखिल भारतीय ५३ वा क्रमांक मिळवला होता.

मनुज जिंदाल हे महाराष्ट्र केडरचे २०१७ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ते एनडीए कॅडेटदेखील होते, जिथे त्यांनी यूपीएससी एनडीए परीक्षेत अखिल भारतीय १८ वा क्रमांक मिळवला होता.

मनुज जिंदाल यांचे बालपण

मनुज जिंदाल हे मूळचे गाझियाबादचे असून त्यांचे शिक्षण डेहराडून येथील एका शाळेत झाले. मनुज जिंदाल यांनी वयाच्या १८ व्या वर्षी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी प्रशिक्षणादरम्यान पहिल्या सत्रात उत्कृष्ट कामगिरी केली, पण त्यांच्या दुसऱ्या सत्रात ते मानसिक तणाव आणि नैराश्यात गेले होते. मनुज जिंदाल यांची प्रकृती खालावल्याने अकादमीने त्यांना अभ्यासक्रमातून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला.

यशाचा प्रवास

या धक्क्यातून सावरण्यासाठी मनुज यांनी परदेशात जाऊन व्हर्जिनिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिथे त्यांनी तीन वर्षे चांगल्या पगाराच्या पॅकेजसह काम केले. पण, नंतर त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यावर त्यांनी पाहिले की, त्यांचा धाकटा भाऊ यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत होता. यावेळी प्रेरित होऊन मनुज यांनीही परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१४ मध्ये परीक्षा दिली. त्यांनी पहिले दोन टप्पे पार केले, पण त्यांना अंतिम यश मिळवता आले नाही.

पण, या अपयशानंतरही मनुज यांनी हार मानली नाही. पुन्हा मेहनत करून मनुज दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. ते परीक्षा उत्तीर्ण झाले, परंतु त्यांना राखीव श्रेणीत ठेवण्यात आले. शेवटी २०१७ मध्ये पुन्हा त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतीय ५३ वा क्रमांक मिळवला. मनुज जिंदाल यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Story img Loader