Success Story: मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक तरुण-तरुणी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्यास पसंती देतात. हल्ली स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. करोना काळापासून तर अनेकांनी नोकरीला राम राम करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, ज्यात अगदी चहा, पोहे अशा पदार्थांपासून ते शेती, कपड्यांचे ब्रँड अशा विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. आज अशाच एका यशस्वी उद्योजकाचा यशस्वी प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बर्गर बे’ नावाच्या स्ट्रीटवेअर ब्रँडचा संस्थापक असलेला रोहन कश्यप हा लुधियानाचा रहिवासी आहे. त्याच्या या व्यवसायाची सुरुवात इन्स्टाग्रामवर कपड्यांचे फोटो पोस्ट करण्यापासून झाली असून आता ही कंपनी १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. इतकंच नव्हे तर ‘शार्क टँक इंडिया सीझन ४’ मध्ये, रोहनला अनुपम मित्तल, कुणाल बहल आणि अमन गुप्ता यांच्याकडून दोन कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा

रोहन कश्यप लुधियानाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याला बर्गर खूप आवडायचा. व्यवसाय करण्यापूर्वी तो एका सोशल मीडिया एजन्सीमध्ये काम करायचा. अशातच त्याच्या आयुष्यात एक मोठा टप्पा आला, जेव्हा त्याने शेअर केलेले स्ट्रीटवेअर डिझाइन इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले. या अनपेक्षित यशाने त्याला ‘बर्गर बे’ तयार करण्यास प्रेरित केले. हा एक डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) फॅशन ब्रँड आहे. त्याची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

पाच वर्षांपूर्वी रोहनने नोकरी सोडली आणि एका वेगळ्या प्रकारच्या कपड्यांचा ब्रँड तयार करण्याचे स्वप्न पाहिले. त्याच्या डिझाईन्स ठळक आणि लक्षवेधी आहेत. हा असा ब्रँड आहे, जो स्पष्ट बोलू इच्छितो आणि नेहमीच चर्चेत राहू इच्छितो. कचरा कमी करण्यासाठी प्रत्येक कपडे कमी प्रमाणात बनवले जातात. ते ५०% कमी पाणी, पर्यावरणपूरक रंग आणि सर्वोत्तम शाकाहारी घटक वापरून बनवले जातात.

ग्राहक झाली गर्लफ्रेंड

२०२३ मध्ये जान्हवी सिकरिया नावाच्या एका तरुणीने ‘बर्गर बे’ची ऑर्डर न मिळाल्याबद्दल इन्स्टाग्रामवर तक्रार केली. यावेळी माफी मागण्याऐवजी रोहनने तिला आयुष्यभर मोफत वस्तू देणार असे सांगितले. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली अन् नंतर जान्हवी रोहनच्या प्रेमात पडली आणि ती कंपनीची सह-संस्थापक बनली.

जेव्हा रोहन ‘बर्गर बे’ शार्क टँक इंडिया सीझन ४ मध्ये गेला तेव्हा जज गोंधळले. त्यांना वाटले की, ‘बर्गर बे’ खाद्य पदार्थ विकणारा ब्रँड असेल. पण रोहन, त्याची बहीण ओजस्वी आणि जान्हवीने त्यांना प्रभाविक केलं. त्याने २.५% इक्विटीसाठी एक कोटी रुपये (४० कोटी रुपयांचे मूल्यांकन) मागितले. शेवटी अनुपम मित्तल, कुणाल बहल आणि अमन गुप्ता यांनी २०% इक्विटीसाठी दोन कोटी रुपये गुंतवले.