Success Story: चंदिगडचा सिद्धार्थ ओबेरॉय अमेरिकेत प्रोजेक्ट इंजिनीयर होता; पण ती नोकरी सोडून त्याने स्वतःची कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याने लेटशेव्ह नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीला त्याने अंबाला येथील एका छोट्या खोलीतून सुरुवात केली होती. आता ‘लेटशेव्ह’ १०० पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारली आहे.

२०१५ मध्ये रचला कंपनीचा पाया

सिद्धार्थ ओबेरॉय मूळचा चंदिगडचा असून, त्याने चंदिगडच्या विवेक हायस्कूलमधून ११वी आणि १२वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चो इंजिनियरिंगसाठी तो अमेरिकेला गेला. त्याने पर्ड्यू युनिव्हर्सिटी, सॅपिएन्झा युनिव्हर्सिटी ऑफ रोम व हार्वर्ड बिझनेस स्कूल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधूनही शिक्षण घेतले. सिद्धार्थने अमेरिकेतील प्रोजेक्ट इंजिनीयरमधून करिअर बदलल्यानंतर २०१५ मध्ये लेटशेव्ह या कंपनीची स्थापना केली. २०१८ मध्ये डोर्को आणि २०२० मध्ये विप्रो यांसारख्या मोठ्या कंपन्यांनीही ‘लेटशेव्ह’मध्ये गुंतवणूक केली. लेटशेव्ह उच्च दर्जाची शेव्हिंग उत्पादने विकते.

सिद्धार्थला अमेरिकेतील असताना ‘लेटशेव्ह’ची कल्पना सुचली. कारण- त्यावेळी बाजारात इतर ग्रूमिंग उत्पादनांसाठी अनेक पर्याय होते; पण शेव्हिंगसाठी मर्यादित पर्यायच उपलब्ध होते. तेव्हाच त्याने शेव्हिंग इंडस्ट्रीत काहीतरी वेगळे करायचे ठरवले. मात्र, त्यावेळी त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि नंतर त्याने प्रोजेक्ट इंजिनीयर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण, हा विचार त्याच्या मनात कायम होता. दोन वर्षांनंतर प्रोजेक्ट इंजिनीयर म्हणून काम करीत असताना त्याला कळले की, एका कोरियन कंपनीने त्याच्यासोबत भागीदारी करण्यास होकार दिला आहे. त्यानंतर त्याने नोकरी सोडली आणि ‘लेटशेव्ह’ सुरू करण्यासाठी २०१५ मध्ये तो भारतात परतला.

हेही वाचा: Success Story: ‘शेतकऱ्याला कमी समजू नका…’ केळीच्या ५०० हून अधिक जातींची लागवड; महिन्याला कमावतात लाखो रुपये

१०x१० मधून सुरू झालेला प्रवास करोडोंच्या घरात

सिद्धार्थने अंबाला येथील एका छोट्याशा १०x१० च्या खोलीतून ‘लेटशेव्ह’ची सुरुवात केली. सुरुवातीला त्याला महिन्याला फक्त ३० ते ४० ऑर्डर मिळायच्या. त्याच्या कंपनीचे सुरुवातीचे महिने निराशाजनक होते. पण, आता ही कंपनी दरमहा सुमारे तीन कोटी रुपयांची कमाई करते. त्याला महिन्याला २०,००० हून अधिक ऑर्डर मिळतात. तसेच या कंपनीचा व्यवसाय आता १०० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. विप्रो आणि कोरियन दिग्गज डोर्को यांसारख्या बड्या कंपन्यांनी या कंपनीत सहभागी झाल्या आहेत. या कंपनीचा ७० टक्के भाग ओबेरॉयकडे आहे.

Story img Loader