Success Story: एखाद्या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी करत असूनही एखाद्याच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा ती नोकरी, पद, पगार सोडून काहीतरी वेगळं करावसं वाटतं. भारतातील अशा अनेक यशस्वी व्यक्तींच्या यशाचा प्रवास तुम्ही ऐकला असेल, ज्यात अनेक जण मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा सरळ शेती घेण्याचे पाऊल उचलतात आणि यशस्वीही होतात. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला सांगणार आहोत.

या व्यक्तीचे नाव श्रीनिवास राव असून त्यांनी अभियांत्रिकीची नोकरी सोडून शेती करायला सुरूवात केली. श्रीनिवास हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर, ते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये काम करू लागले. परंतु, हे काम करताना ते सतत तणावात असायचे. त्यांनी त्यांच्या मित्रांशी यावर चर्चा केली. काही मित्रांनी त्यांना ग्रामीण व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला. अशा परिस्थितीत त्यांनी XIMB (झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भुवनेश्वर) मध्ये प्रवेश घेतला. जिथे ते शेतीशी जोडले गेले.

नोकरी सोडून सुरू केली शेती

त्यांनी आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडच्या डोंगराळ आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने बाजरीची लागवड केली. शाश्वत शेतीद्वारे या समुदायांचे जीवन सुधारण्याच्या क्षमतेकडे श्रीनिवास आकर्षित झाले. त्यांनी २०१८ मध्ये मन्यम ग्रेन्स नावाची कंपनी स्थापन केली आणि शेतकऱ्यांकडून बाजरीची खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी ही बाजरी बाजारात विकली, त्यातून त्यांना सामान्य बाजरीच्या तुलनेत जास्त पैसे मिळाले. त्याचे फायदेही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

श्रीनिवास यांनी त्यांच्या व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढवले आहे. ते आता शेतकऱ्यांच्या बाजरीला जास्त भाव देतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रीनिवास त्यांच्या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. ते प्रक्रिया केलेले बाजरी ऑफलाइन विकतात. २०२३-२४ मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त होता

Story img Loader