Success Story: आयुष्यात हवे तसे यश मिळविण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि मग स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट ते अर्धवट सोडून देतात; तर काही जण मिळालेल्या थोड्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात की, जे संकटाला तोंड देऊन पुन्हा नवी सुरुवात करून, आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. तसेच मिळविलेल्या यशाची उंची आणखी जास्त कशा रीतीनं वाढविता येईल याचा विचार करतात. भारतात असे अनेक उद्योजक आहेत की, ज्यांनी मेहनत करून स्वबळावर आपलं स्वप्न साकारलं आहे.

बिपीन हदवानी यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात शून्यापासून केली असली तरीही आज ते कोट्यवधींचा व्यवसाय सांभाळतात. १९९० मध्ये त्यांनी वडिलांकडून ४,५०० रुपये उसने घेऊन स्नॅक्सचा व्यवसाय सुरू केला. चार वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर केलेली भागीदारी सोडून अडीच लाखांत ‘गोपाल स्नॅक्स’चा पाया रचला. खरं तर, बिपीन हदवानी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील गावातील एका छोट्या दुकानातून स्वादिष्ट गुजराती नमकीनचा व्यवसाय चालवायचे आणि सायकलवरून जवळच्या गावांमध्ये ते पदार्थ विकायचे. लहानपणापासूनच बिपीन यांना वडिलांच्या छोट्या व्यवसायात रस होता. शाळा सुटल्यानंतर ते वडिलांबरोबर खारट चवयुक्त पदार्थ विकायला जायचे. येथूनच त्यांना त्यांच्या व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा

वडिलांबरोबर काम केल्यानंतर बिपीन यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९९० मध्ये त्यांनी वडिलांकडून ४,५०० रुपये उसने घेतले आणि मित्राबरोबर स्नॅक्सचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा भागीदारीतील व्यवसाय चार वर्षे चालू होता. त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. बिपीन यांना त्यांच्या या व्यवसायतून अडीच लाख रुपये मिळाले. या पैशातून त्यांनी एका नवीन व्यवसायाला सुरुवात केली.

हेही वाचा: Success Story : अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहणारा झाला व्यावसायिक; आईस्क्रीम विक्रीतून कमावले करोडो रुपये

१९९४ मध्ये बिपीन यांनी नवीन घर विकत घेतले आणि आपल्या पत्नीच्या मदतीनं घरातच ‘गोपाल स्नॅक्स’चा कारखाना उभारला. सुरुवातीच्या काळात त्यांनी राजकोटच्या रस्त्यांवर सायकलवरून फिरून पदार्थ विकले. कालांतराने वाढत्या मागणीमुळे त्यांना शहराबाहेर कारखाना उभारावा लागला; परंतु, तो लांब असल्यामुळे बंद झाला. पण, हदवानी यांनी हार मानली नाही आणि शहरात एक छोटेसे युनिट सुरू केले, जे खूप यशस्वी झाले. आज गोपाल स्नॅक्स हा भारतातील चौथा सर्वांत मोठा पारंपरिक स्नॅक्स ब्रॅण्ड आहे. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल ५,५३९ कोटी रुपये आहे.

बिपीन हदवानी यांच्यासारख्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीनं मेहनतीच्या जोरावर उभारलेला हा व्यवसाय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.