Success Story: मोबिक्विकचे संस्थापक बिपीन प्रीत सिंग यांनी आठ लाख रुपयांच्या बचतीतून एक छोटा स्टार्टअप सुरू केला. काही वेळातच हे स्टार्टअप मोठ्या फिनटेक कंपनीत बदलले. आज त्यांची कंपनी वर्षाला करोडो रुपये कमावते.

बिपीन प्रीत सिंग हे दिल्लीचे रहिवासी असून, ते आयआयटी-दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी फ्रीस्केल सेमीकंडक्टर नावाच्या टेक फर्ममध्ये सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून काम केले. २००० मध्ये बिपीन प्रीत सिंग यांनी भारतात मोबाईल इंटरनेटचा वाढता वापर पाहिला. ते लक्षात घेतल्यावर त्यांनी डिजिटल पेमेंट सोल्युशन तयार करण्याची संकल्पना विकसित केली, जी ऑनलाइन व्यवहारादरम्यान वापरकर्त्यांच्या बँक आणि कार्ड तपशिलांचे संरक्षण करते. मात्र, स्टार्टअपची त्यांची संकल्पना सुरू करण्याची योजना ठाम होती; परंतु त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

आठ लाखांच्या बचतीतून व्यवसायाला प्रारंभ

२००९ मध्ये आयुष्यभराच्या बचतीतून त्यांनी आठ लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेऊन, त्यांनी दिल्ली येथे एक छोटे कार्यालय भाड्याने घेतले आणि मोबिक्विकची पायाभरणी केली. त्यांच्या छोट्या कार्यालयातून काम करताना, बिपीन आणि त्यांची पत्नी उपासना सिंग यांनी ‘मोबिक्विक’ला वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ आणि अधिक सोईस्कर बनवण्यासाठी नवीन मार्गांवर काम केले. परंतु, त्यावेळी पारंपरिक मोबाईल सेवांना काही मर्यादा होत्या. त्यामुळे त्रुटी टाळण्यासाठी बिपीन यांनी मोबिक्विकला ‘पुल’ मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. कारण- त्याद्वारे वापरकर्ते थेट रिचार्ज आणि प्रीमियम ॲप्स ऍक्सेस करू शकतात. या नवीन वैशिष्ट्याने बिपीन यांच्या स्टार्टअपला PVR आणि ‘कॅफे कॉफी डे’सारख्या आघाडीच्या ब्रॅण्डसह आकर्षक भागीदारी करण्यास मदत केली.

हेही वाचा: Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

२०१५ पर्यंत मोबिक्विकचे १५ दशलक्ष वापरकर्ते आणि २५,००० व्यापारी ग्राहक होते. परंतु, काही वर्षांनंतर, अनेक नवीन फिनटेक स्टार्टअप्स आणि टेक दिग्गजांचा पाठिंबा असलेले डिजिटल पेमेंट ॲप्स भारतात वेगाने उदयास येऊ लागले. अशा संस्थांशी स्पर्धा करणे जवळजवळ अशक्य आहे हे ओळखून सिंग यांनी मोबिक्विकमध्ये गुंतवणूक मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बजाज फायनान्सला १०.८३ % भाग विकला. मोबिक्विकच्या वापरकर्त्यांची संख्या १० कोटींपर्यंत वाढल्याने हे पाऊल एक मास्टरस्ट्रोक ठरले. आता त्यांची वार्षिक उलाढाल ८९०.३२ कोटी रुपये आहे, जी २०२३ च्या तुलनेत ५८.६७% वाढली आहे. आज मोबिक्विकचे बाजार भांडवल २३,५६७ कोटी रुपये आहे.