Success Story: स्वप्न साकारण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगण्याचा प्रयत्न करते. परंतु, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला व्यावसायिक, तर कोणाला आणखी काही. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवे तसे यश मिळत नाही. मग त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात की, जे संकटाला तोंड देत पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी ती गोष्ट मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत की, ज्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि करोडोंची संपत्ती उभी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृष्णदास पॉल यांनी वयाच्या ६० व्या वर्षी SAJ फूड नावाची स्वतःची कंपनी सुरू केली, SAJ हे कंपनीचे नाव त्यांनी त्यांची मुले शर्मिष्ठा, अर्पण व जयिता यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांवरून ठेवले आहे. ही कंपनी सुरू करण्यामागे साखरमुक्त बिस्किटे तयार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे त्यांनी २००० मध्ये बिस्क फार्म्सची स्थापना केली. या काळात कंपनीला यश मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. २००४ मध्ये बिस्क फार्म्सला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तब्बल १५ कोटींचे नुकसान झाले.

परंतु, या आर्थिक संकटावर मात करीत कृष्णदास पॉल यांनी पूर्व भारतावर लक्ष केंद्रित करून, बिस्किटांचे जवळपास सात नवीन प्रकार लाँच केले. या बिस्किटाच्या प्रत्येक प्रकारामध्ये एक विशिष्ट चव आहे. या चवीमुळे पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार व ओडिशामध्ये या कंपनीची बिस्किटे खूप लोकप्रिय आहेत. त्यानंतर बिस्क फार्म्स ही कंपनी बाजारातील मोठी ब्रॅण्डेड कंपनी म्हणून प्रचलित झाली. या कंपनीने पूर्व भारतात दुसरे स्थान पटकावले आहे. २००८ पर्यंत कंपनीच्या विक्रीद्वारे २०० कोटींची कमाई केली.

हेही वाचा: Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! रेल्वेस्थानकावर झोपण्यापासून ते ९२,००० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा सत्यनारायण नुवाल यांचा खडतर प्रवास

कृष्णदास पॉल यांचे दुर्दैवाने २०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या आजाराच्या पहिल्या लाटेत निधन झाले. मात्र, त्यानंतर त्यांचा मुलगा अर्पण पॉल याने कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. SAJ फूडने २०२३ च्या आर्थिक वर्षात (की- २१०० कोटींची उलाढाल केली होती.

कृष्णदास पॉल यांचा जन्म बर्दवानमधील कमरकिता गावात झाला. शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांच्या वडिलांच्या व्यापारात लक्ष देऊ लागले. पण, कालांतराने त्यांचा कौटुंबिक व्यवसाय पाच भावांमध्ये विभागला गेला तेव्हा कृष्णदास पॉल यांनी १९७४ मध्ये त्यांनी अपर्णा एजन्सी ही स्वतःची कंपनी सुरू केली. त्यांनी नेस्ले, डाबर व रेकिट अॅण्ड कोलमन यांसारख्या ब्रॅण्डसाठी उत्पादने वितरित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २००० मध्ये त्यांनी ‘बिस्क फार्म्स’ स्थापन केली. आता ‘बिस्क फार्म्स’ पाच कारखाने चालवते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story started business at the age of 60 building a company worth 2100 crores without incurring a loss of 15 crores sap