Success Story: स्टॅलियन ग्रुपचे अध्यक्ष वासवानी यांना वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचे वडील सुंदर डी वासवानी यांच्या नायजेरियन व्यवसायाचा वारसा मिळाला. आता हा व्यवसाय करोडोंच्या घरात पोहोचला आहे.भारतात अनेक यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांनी आपल्या कतृत्वाच्या जोरावर व्यवसायाची उंची गाठली आहे. पण, अनेक भारतीय असेही आहेत, ज्यांनी परदेशात राहून आपले आणि देशाचेही नाव मोठे केले आहे. त्यातील एक म्हणजे जयपूरमध्ये जन्मलेले सुनील वासवानी हे आहेत. सुनील वासवानी हे भारतीय वंशाचे नायजेरियन अब्जाधीश आहेत. स्टॅलियन ग्रुपचे अध्यक्ष वासवानी यांना वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचे वडील सुंदर डी वासवानी यांच्या नायजेरियन व्यवसायाचा वारसा मिळाला. आता हा व्यवसाय करोडोंच्या घरात पोहोचला आहे.
वयाच्या २१ व्या वर्षी व्यवसायाची जबाबदारी
वयाच्या २१ व्या वर्षी सुनील वासवानी यांच्यावर कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी आली. नायजेरियातील काही कायदेशीर अडचणींनंतर, त्यांनी २००३ मध्ये आपला व्यवसाय संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये हस्तांतरित केला. २०१५ आणि २०१६ मध्ये सलग दोन वर्षे फोर्ब्स मिडल ईस्टने त्यांना ‘अरब जगातील अव्वल भारतीय नेता’ म्हणून घोषित केले.
सुनील वासवानी यांचे शिक्षण
सुनील वासवानी यांनी लंडनमधून अर्थशास्त्र आणि अकाउंटन्सीचे शिक्षण घेतले. वासवानी यांनी व्यावसायिक जगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुबईस्थित स्टॅलियन ग्रुपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कंपनीला नवीन उंचीवर नेले आहे. त्यांनी अनेक देशांमध्ये कार्यरत असलेला एक बहुराष्ट्रीय गट बनवला. आता त्यांचा व्यवसाय ऑटोमोबाईल, शेती, खत, अन्न आणि वितरण यांसह अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
करोडोंच्या संपत्तीचे मालक
सुनील वासवानी त्यांच्या पत्नी रीताबरोबर दुबईमध्ये राहतात. त्यांच्याकडे ब्रिटीश आणि नायजेरियन नागरिकत्व आहे. ते नायजेरियातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. जानेवारी २०२१ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती ५०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४,३३२ कोटी रुपये) होती. सुनील वासवानी यांची कहाणी तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने यश कसे मिळवता येते हे यातून दिसून येते.