Success Story: शेतकऱ्याला कधीही कमी समजू नका असं अनेकदा म्हटलं जातं. हरियाणातील दोन भावंडांनी हे म्हणणं खरं करून दाखवलं आहे. खरं तर केशरला जगातील सर्वात महाग मसाला म्हटले जाते. शिवाय त्याची लागवड करण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. हरियाणातील नवीन आणि प्रवीण सिंधू या दोन भावांनी घरामध्ये केशर पिकवण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. यासाठी त्यांनी इराण आणि इस्रायलचे प्रगत एरोपोनिक तंत्रज्ञान वापरले. यामध्ये झाडे मातीशिवाय हवेत वाढतात. या तंत्राने त्यांनी घराच्या गच्चीवर काश्मिरी केशर पिकवून लाखो रुपये कमावले आहेत.

शिक्षण घेत असताना प्रवीणला सुचली होती कल्पना

Mtech चे शिक्षण घेत असताना प्रवीण सिंधूला ही कल्पना सुचली होती. घरामध्ये केशर पिकवण्याबाबत त्याने अनेक ठिकाणी वाचले होते. २०१६ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रवीणने त्याच्या भावाच्या मदतीने हा अनोखा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यापूर्वी प्रवीणने थायलंडला जाऊन कॉर्डीसेप्स मशरूम वाढवण्याचे प्रशिक्षण घेतले. हे मशरूम त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. शिवाय यादरम्यान त्याचा भाऊ नवीनने जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे केशर लागवड शिकण्यासाठी गेला. पंपोर हे केशर लागवडीचे केंद्र आहे. भारतातील सुमारे ९०% केशर या ठिकाणी पिकवले जाते. त्याने तिथल्या शेतकऱ्यांकडून केशर पिकवण्याच्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. २०१८ मध्ये या दोन्ही भावांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरील १५x१५ च्या खोलीचे एका छोट्या प्रयोगशाळेत रूपांतर केले.

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
In yavatmal front of collectors office Shetkari Warkari Sangathan protested today while celebrated Black Diwali
यवतमाळ : काळी दिवाळी अन शिदोरी…, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
Lakshmi Pujan in traditional fervor fireworks at the business premises
लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात, व्यापारी पेठेत आतषबाजी

केशर लागवडीदरम्यान करावा लागला अनेक अडचणींचा सामना

केशरची लागवड करतेवेळी प्रवीण आणि नवीन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी सर्वप्रथम काश्मीरमधून १०० किलो केशराचे बल्ब ऑनलाइन मागवले होते. पण, ते वाईट अवस्थेत पोहोचले. इतके मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांनी एक वर्षानंतर पंपोरला जाऊन बल्ब विकत घेतले. २०१९ मध्ये त्यांनी १०० किलो बल्ब खरेदी केले आणि ते वाढवण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी हे केशर त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना भेट म्हणून दिले. यामुळे प्रोत्साहित होऊन त्यांनी मध्यस्थांना मागे टाकत पुढच्या हंगामात थेट ७०० किलो बल्ब खरेदी केले. त्या पिकातून त्यांना ५०० ग्रॅम केशर मिळाले, ते त्यांनी अडीच लाख रुपयांना विकले. २०२३ मध्ये त्यांच्या छोट्या प्रयोगशाळेत दोन किलो केशर तयार झाले, यातून त्यांनी १० लाख रुपये कमावले.

हेही वाचा: Success Story: वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर विकल्या बांगड्या आणि मेहनतीच्या जोरावर झाले IAS अधिकारी

परदेशातही केशरची निर्यात

ही दोन्ही भावंडं आता यूएस, यूके आणि देशांतर्गत बाजारात त्यांच्या ‘अमर्त्वा’ ब्रँडखाली केशर विकतात आणि निर्यात करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी ते ऑफ-सीझनमध्ये प्रयोगशाळेत कॉर्डीसेप्स किंवा बटन मशरूम वाढवण्याची योजना करतात. ऑगस्टच्या मध्यात प्रयोगशाळेत केशर बल्ब लावले जातात. नोव्हेंबरच्या मध्यात फुले येऊ लागतात. ते हाताने फुलांपासून केशराचे धागे वेगळे करतात. कापणीनंतर उरलेल्या फुलांच्या पाकळ्या कॉस्मेटिक कंपन्यांना विकल्या जातात, यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते.