Success Story: यशस्वी व्यक्ती होण्यासाठी अनेकदा आपण कशा मित्रांच्या संगतीत राहतो हे देखील खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा मित्रांमुळे व्यक्तीचे चांगले आयुष्यही बिघडू शकते, तर चांगल्या मित्रांमुळे एखाद्याचे साधारण आयुष्यही सुधारू शकते. आज अशाच दोन मित्रांच्या व्यवसायाचा प्रवास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांनी एकत्र येऊन एक व्यवसाय सुरू केला.
इंदोर येथील रहिवासी आकाश जोशी आणि अंकुर पाठक यांनी २०१६ मध्ये दोन खोल्यांच्या कार्यालयातून IMAST सुरू केले. आठ वर्षांनंतर या स्टार्टअपने १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
खरंतर, आकाशला त्याची कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वतःचे काहीतरी करायचे होते. अंकुरबरोबर मिळून त्यांनी IMAST या व्यवसायाचा पाया घातला. सुरुवातीला त्यांनी पंप उद्योगावर भर दिला. नंतर IMAST ३६० सारख्या उत्पादनांसह अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा विस्तार केला. कंपनीचा महसूल आता १.१३ कोटी रुपये आहे.
२०१६ मध्ये सुरू केला व्यवसाय
आकाश जोशी आणि अंकुर पाठक यांनी २०१६ मध्ये इंदूरमधून IMAST सुरू केले. हे स्टार्टअप उद्योगांना तंत्रज्ञान समाधान (technical solutions) प्रदान करते. आठ वर्षांत IMAST ने १०० कोटी उभारले. IMAST चे १०० पेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्याची स्पर्धा Accenture, Amdocs, Capgemini सारख्या कंपन्यांशी आहे. IMAST मध्ये आता १५० पेक्षा जास्त कर्मचारी असून अशोक लेलँड, ट्रायडंट ग्रुप, रेमंड्स यांसारख्या कंपन्या त्यांचे ग्राहक आहेत.
आकाश जोशीचे शिक्षण
आकाश जोशी हे मध्य प्रदेशचे असून ते एका सामान्य कुटुंबात वाढले होते. ते अभ्यासात हुशार होते. बारावीत चांगले गुण मिळविल्यानंतर त्यांनी व्हीएमयू सालेम विद्यापीठातून अभियांत्रिकी ऑनर्स आणि नंतर एमबीए करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि हिंदुस्थान नॅशनल ग्लाससारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त त्यांनी PWC, BCG, Accenture आणि Vector सारख्या सल्लागार कंपन्यांसाठी काम केले. नंतर ते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये मार्केटिंग कम्युनिकेशनचे असिस्टंट मॅनेजर म्हणून रुजू झाले.
तसेच अंकुर पाठक यांना आयटी, सप्लाय चेन आणि फायनान्स ऑपरेशन्सचा दशकाहून अधिक अनुभव आहे. तंत्रज्ञान-समर्थित चॅनेल परिवर्तन आणि प्रक्रिया कस्टमायझेशनमधील त्यांच्या कौशल्यासह त्यांनी जगभरात १०० हून अधिक ब्रँड्सना सेवा दिली आहे. शिवाय, त्यांनी सीमेन्स, रेमंड आणि इतर मोठ्या ब्रँड्समध्ये काम केले आहे.