UPSC Success Story Of hemant: अपमानानंतर गळा पकडणारे वा हतबल होणारे बरेच, पण, अपमानाला यशाची संधी समजणारे विरळाच. सुडाची भावना माणसाला कोणत्याही थराला जाण्यास भाग पाडू शकते. यातून काही लोक चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात, तर काही जण सरळ मार्गाने जात सत्याचा आणि सातत्याने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा शेवटी विजय होतोच हे दाखवून देतात. आयुष्यात अपमानाचा प्रत्येकालाच सामना कधी ना कधी करावा लागतो. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो. त्या क्षणी जरी अपमान गिळत असलो तरी झालेला अपमान कुणीही विसरत नाही. काही जण चुकीच्या मार्गाने याचा बदला घेतात, मात्र यश संपादन करणं हाच सगळ्यात मोठा बदला आहे; हे तर साऱ्यांनाच मान्य असेल. मात्र, फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात.
अशाच एका तरुणानं लहानपणी झालेल्या अपमानाचा बदला यूपीएससीची सिव्हिल सर्विसेस परीक्षा २०२३ क्रॅक करून घेतला आहे. त्यांच्या जीवनातील हे सर्वात मोठे यशच नाही तर अपमानाचा खूप मोठा बदला त्यांनी घेतला आहे.
“तू काय मोठा कलेक्टर आहेस?”
हनुमानगढ जिल्ह्यातील भिरणी भागातील बिरन या छोट्याशा गावात राहणाऱ्या हेमंत यांनी यूपीएससीमध्ये ८८४ वा क्रमांक पटकावला आहे. आई गावी मजुरी करायची, तर वडील खेडेगावात पुजारी होते. हेमंत यांनी मोठ्या कष्टाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. हेमंत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यशाचं शिखर पार केलं आहे. मात्र, याला सुरुवात झाली ती अपमानापासून… लहानपणी आईला योग्य मजुरी न मिळाल्याने हेमंत कॉन्ट्रॅक्टरकडे जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी कॉन्ट्रॅक्टरने त्याला हाकलून दिले आणि तू कोण मोठा कलेक्टर आहेस का, अशा शब्दात त्यांचा अपमान केला होता. त्यांचं हे वाक्य हेमंत यांना फार लागलं होतं आणि यानंतर हेमंत यांनी कलेक्टर होण्याचा निर्णय घेतला. यानंतर हेमंतने जिल्हाधिकारी कार्यालयाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सनदी अधिकारी होण्याचा निश्चय केला.
तयारीसाठी दिल्लीला जाण्यासाठी सोसायटीने केली मदत
हेमंतची तळमळ आणि इच्छाशक्ती पाहून समाजातील लोकांनी आणि ओळखीच्या लोकांनी त्याला दिल्लीला जाण्यास मदत केली. दिल्ली येथे तयारीला पाठवण्यासाठी लोकांनी आर्थिक मदत केली. प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकांना आपले ध्येय साध्य करता येत नसल्याचे अनेकदा दिसून येते. पण असे म्हणतात की, जर तुमची इच्छाशक्ती मजबूत असेल तर तुम्हाला कोणतीही भिंत अडवू शकत नाही.
हेही वाचा >> “शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
राजस्थानातील हनुमानगड येथील रहिवासी हेमंत हे याचे उदाहरण आहे. हेमंतने शारीरिक समस्यांवरही मात करत यश संपादन केले आहे.