Success Story: विराज बहल हे देशातील एक यशस्वी उद्योजक आहेत, जे शार्क टँक इंडियाच्या चौथ्या सीझनमध्ये नवीन जज म्हणून सहभागी झाले आहेत. विराज यांच्या यशाचा प्रवास लहान सुरुवातीपासून मोठ्या व्यवसायाची उभारणी करण्यापर्यंतचा आहे. त्यांना लोक भारतातील FMCG क्षेत्रातील सॉस उत्पादन करणारी वीबा फूड्स (Veeba Foods) कंपनीचे संस्थापक आणि MD म्हणून ओळखतात. २०१३ मध्ये सुरू झालेला वीबा फूड्स आज एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. याने भारतीय खाद्य उद्योगाला नवे रूप दिले आहे. पण, विराज यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार आले. सुरुवातीच्या अपयशापासून ते आर्थिक अडचणींपर्यंत विराज यांनी प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना केला आणि यश मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराज लहानपणापासून खाद्यपदार्थ व्यवसायाशी जोडले गेले होते, ते अनेकदा वडिलांच्या कारखान्यात जायचे. दिल्लीतील ट्रेड फेअरमधील फन फूड्स स्टॉलवर त्यांची पहिली नोकरी होती. त्यांना लहानपणापासूनच अन्नप्रक्रियेची आवड निर्माण झाली. मात्र, विराज यांनी आधी स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे असे त्यांचे वडील राजीव बहल यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी मरीन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवली. परंतु, चांगल्या पगाराची नोकरी असूनही विराज यांचे मन कौटुंबिक व्यवसायावर केंद्रित होते.

वडिलांनी विकली कंपनी

वडिलांच्या परवानगीनंतर विराज यांनी २००२ मध्ये फन फूड्समध्ये प्रवेश केला. राजीव बहल यांच्या नेतृत्वाखाली कंपनी झपाट्याने वाढत होती. सहा वर्षांत, विराज यांनी फन फूड्सला एक प्रसिद्ध ब्रँड बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, विराजसाठी २००८ मध्ये एक मोठे वळण आले, जेव्हा त्यांच्या वडिलांनी फन फूड्सला जर्मन कंपनी डॉ. ओटकर यांना ११० कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी विराज यांनी विरोध केला, पण कंपनी विकली गेली. हा त्यांच्यासाठी भावनिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मोठा धक्का होता.

वीबा कंपनीची स्थापना

यानंतर विराज यांनी २००९ मध्ये ‘पॉकेट फूल’ नावाने हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. मात्र, चार वर्षांनंतर हा व्यवसाय तोट्यात गेला. या हॉटेलचे सर्व सहा आउटलेट २०१३ पर्यंत बंद झाले. या अपयशामुळे विराज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले, पत्नीच्या पाठिंब्याने विराज यांनी पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. घर विकून नवीन व्यवसायासाठी पैसा उभा केला. यावेळी विराज अन्न प्रक्रिया उद्योगात परतले आणि २०१३ मध्ये नीमराना, राजस्थानमध्ये वीबा फूड्सची स्थापना केली. गुणवत्ता आणि नाविन्य यावर लक्ष केंद्रित करून, वीबा त्वरीत एक आघाडीची सॉस कंपनी बनली आणि या कंपनीला देशभरात ओळख मिळाली.

हेही वाचा: Success Story : “शेतकरी असावा तर असा…” भाड्याने जमीन घेऊन केली हळदीची शेती; डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून झाला लोकप्रिय

एक हजार कोटी कमावण्याचे लक्ष

वीबा फूड्सची गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वीबा फूड्सची अद्याप स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी झालेली नसली तरी विराज यांचा कंपनीतील मोठा हिस्सा आणि गुंतवणूकदारांकडून मिळालेला पाठिंबा याच्या वाढीस मदत करत आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story viraj bahl sold the company sold the house and built a multi crore business through hard work sap