success story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, जे मेहनतीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नातच यश मिळवतात. बिहारमधील आकाश राजनेदेखील अशीच उत्तम कामगिरी केली आहे; ज्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनादेखील त्याचा अभिमान वाटतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील आकाश राज या विद्यार्थ्याने जिद्द, चिकाटी व मेहनत यांच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कनिष्ठ अभियंता (JE) सिव्हिल परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) 1 मिळवला आहे.

आकाश राजने यूपीएससी, जेई परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला क्रमांक पटकावला आहे. २०१८ मध्ये बंगळुरू कॉलेजमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग (BE EEE) मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर त्याला पाच लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळाली. पण, त्याला त्या कामात फारसा रस नसल्यामुळे त्याने ती नोकरी सोडली. त्यानंतर त्याने पश्चिम बंगालच्या केंद्रीय विद्यालय संघटनेत काम करण्यास पसंती दिली. UPSC JE साठी २० जागा रिक्त झाल्याचे कळताच त्याने ८ एप्रिल रोजी फॉर्म भरला. त्यानंतर दिवस-रात्र अभ्यास करून त्याने परीक्षेची उत्तम तयारी केली. ८ ऑक्टोबर रोजी तो परीक्षेला बसला आणि काही दिवसांत निकाल लागताच तो या परीक्षेत पहिला आल्याची बातमी समोर आली.

हेही वाचा: Success Story: याला म्हणतात जिद्द! ‘रॅपिडो’च्या संस्थापकाने ७५ वेळा नकार मिळूनही मानली नाही हार अन् उभी केली तब्बल ६७०० कोटींची कंपनी

एका मुलाखतीत आकाश म्हणाला, “अपयशातून नेहमी शिकले पाहिजे. तो आणि त्याचे मित्र अनेक वेळा परीक्षेत नापास झाले; पण त्यांनी कधीच हार मानली नाही. आज त्याचे अनेक मित्र चांगल्या पदावर आहेत. शेवटी मेहनतीमुळेच यश मिळाले.” आकाशची ही कामगिरी केवळ त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि समाजासाठीच नाही, तर अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आदर्शवत अशी आहे.

आकाश राजच्या आई सरिता देवी महाविद्यालयात शिक्षिका; तर त्याचे वडील वीरेंद्र कुमार बिहारच्या पूर्णिया येथील आरकेके कॉलेजचे प्राचार्य आहेत. त्याच्या पालकांना त्यांच्या मुलाच्या कामगिरीचा खूप अभिमान आणि आनंद आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story well done akash raj got all india rank air 1 in upsc je civil exam in first attempt sap